आयकर भरत असाल तर रेशन बंद; नोकरी करणाऱ्या तीन हजार कुटुंबाचे धान्य वाटप थांबविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 18:44 IST2024-08-06T18:44:13+5:302024-08-06T18:44:58+5:30
Yavatmal : आधारकार्ड आणि पॅनकार्डमुळे आयकर भरणारे कर्मचारी शासकीय यंत्रणेच्या निदर्शनास

Ration off if paying income tax; Food distribution of three thousand working families was stopped
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासकीय नोकरीत असताना अनेक कर्मचाऱ्यांनी रेशनचा उचल केला. अशा रेशन उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावाची यादीच आयकर विभागाने जाहीर केली आहे. अशा ग्राहकांचे रेशन बंद करण्याच्या सूचना पुरवठा विभागाला मिळाल्या आहेत. जिल्ह्यातील अशा तीन हजार १८७ ग्राहकांचे रेशन बंद करण्यात आले आहे.
सर्वसामान्य कुटुंबाला आर्थिक हातभार मिळावा म्हणून रेशनची संकल्पना आली. या ठिकाणावरून सर्वसामान्य आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला मदत दिली जाते. शासकीय नोकरीत लागलेल्या कर्मचाऱ्यांनी धान्याची उचल केली आहे. या विरोधातील कारवाई आता सुरू करण्यात आली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांचे रेशन बंद
- आधारकार्ड आणि पॅनकार्डमुळे आयकर भरणारे कर्मचारी शासकीय यंत्रणेच्या निदर्शनास आले. चुकीच्या पद्धतीने ही मंडळी धान्याची उचल करीत होती. अशा कार्डधारकांचे रेशन बंद करण्यात आले. यामुळे पुढील काळात चुकीच्या पद्धतीने धान्याची उचल केली तर कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत आहेत.
- तीन हजारांवर कुटुंब अंतोदय, प्राधान्य गटाला रेशन दुकानातून धान्य दिले जाते. यामध्ये अंत्योदय कार्डधारकांनी प्रत्येक कार्डवर ३५ किलो धान्य दिले जाते. प्राधान्य कुटुंबाला प्रत्येक पाच किलो धान्य देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे धान्य मिळविण्यासाठी तीन हजार १८७ कार्डधारकांनी त्याचा उचल केला. धान्याची ही उचल चुकीच्या मार्गाने झाली आहे. यामुळे अशा कार्डधारकांचे धान्य बंद करण्यात आले आहे.