शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्यक्षपदासाठी रस्सीखेच

By admin | Updated: July 21, 2014 00:24 IST

येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी आता प्रचंड रस्सीखेच सुरू झाली आहे. सहा उमेदवारांनी या पदासाठी अर्ज दाखल केले असून त्यात विरोधी गटातर्फे चक्क चौघांनी अर्ज भरले आहे.

वणी : येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी आता प्रचंड रस्सीखेच सुरू झाली आहे. सहा उमेदवारांनी या पदासाठी अर्ज दाखल केले असून त्यात विरोधी गटातर्फे चक्क चौघांनी अर्ज भरले आहे. येथील नगरपरिषद सतत विविध कारणांनी चर्चेत असते. आता नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीमुळे पुन्हा ही नगरपरिषद चर्चेत आली आहे. यावेळी नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या महिला सदस्यासाठी आरक्षित असल्याने त्याबाबत फारशी उत्सुकता नाही. कारण या प्रवर्गातील दोनच महिला सदस्य आहेत. त्यात सत्ताधाऱ्यांकडे अपक्ष करुणा कांबळे, तर विरोधकांकडे मनसेच्या प्रिया लभाने यांचा समावेश आहे. अध्यक्ष पद आरक्षित असल्यामुळेच आता उपाध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा वाद विभागीय आयुक्तांच्या दरबारात पोहोचला आहे. लभाने यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांनी अपिल केले आहे. त्यामुळे शनिवारी येथील या दोनही पदांची निवडणूक होऊ शकली नाही. सोमवारी लभाने यांच्या अपिलावर निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतरच या दोनही पदांच्या निवडीचा मार्ग सुकर होणार आहे. दरम्यान आता उपाध्यक्ष पदासाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. विरोधकांना त्यासाठी धडपड चालविली आहे. उपाध्यक्ष पदासाठी विरोधकांतर्फे मनसेचे गटनेते अभिजित सातोकर, राजेश डफ, अशोक बुरडकर आणि धनंजय त्रिंबके यांनी, तर सत्ताधाऱ्यांतर्फे कॉंग्रेसचे कैसर पटेल व अपक्ष धनराज भोंगळे यांनी अर्ज दाखल केले आहे. भोंगळे आणि पटेल या दोघांपैकी एक उमेदवारग अर्ज मागे ोणार आहे. त्यामुळे सत्ताधााऱ्यांतर्फे केवळ एकच अमेदवार रिंगणात राहणार आहे. मात्र चार विरोधी उमेदवारांपैकी नेकमे कोण अर्ज मागे घेतात, याबाबत अद्याप गुढ कायम आहे. (कार्यालय प्रतिनिधी)