राळेगावात ३८० शेतकऱ्यांची तूर उघड्यावर
By Admin | Updated: May 18, 2017 00:52 IST2017-05-18T00:52:31+5:302017-05-18T00:52:31+5:30
बाजार समितीत तुरीची प्रचंड आवक झाली असून आतापर्यंत ३८० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

राळेगावात ३८० शेतकऱ्यांची तूर उघड्यावर
ढिसाळ नियोजन : दिवसभरात केवळ तीन शेतकऱ्यांची तूर खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : बाजार समितीत तुरीची प्रचंड आवक झाली असून आतापर्यंत ३८० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यासाठी नाफेड अधिकारी सज्ज असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र हजारो क्विंटल तूर उघड्यावर पडून आहे.
मोठ्या प्रमाणात झालेल्या तुरीच्या आवकमुळे बाजार समितीचे पक्के शेड अपुरे पडत असून शेतकऱ्यांचा माल उघड्यावर पडला आहे. अनेक शेतकऱ्यांनी दोन दिवसांपासून या ठिकाणी ठिय्या मांडल्याचे सांगितले. पाच हजार ५० या आधारभूत भावाने तुरी खरेदी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. बाजार समिती व खरेदी विक्री संघाचे संचालक येथील व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे शेतकरी काळजीत आहे.
ढिसाळ नियोजन आणि अपुरी यंत्रणा याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. गुरुवारी दिवसभरात बाजार समितीमध्ये केवळ तीन शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांची संख्या पाहता यंत्रणा अतिशय कमी असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येते.