शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राजस्थानी सावकारांचा पुन्हा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 21:55 IST

गरजू कष्टकऱ्यांना कर्ज देऊन अव्वाच्या सव्वा व्याज घेणाऱ्या लुटारू राजस्थानी सावकारांची टोळी पुन्हा एकदा वणी तालुक्यात दाखल झाली आहे. मध्यंतरी तालुक्यातील घोन्सा येथील काही नागरिकांनी मुकूटबन पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर कारवाईच्या भीतीने ही टोळी भूमिगत झाली होती. मात्र ही टोळी वणी तालुक्यात पुन्हा दाखल झाली असून घोन्सा येथून मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण-घेवाणीचा व्यवहार सुरू असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे२० जणांची टोळी : घोन्सातून चालतो देवाण-घेवाणीचा व्यवहार, दुप्पट व्याजाची आकारणी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गरजू कष्टकऱ्यांना कर्ज देऊन अव्वाच्या सव्वा व्याज घेणाऱ्या लुटारू राजस्थानी सावकारांची टोळी पुन्हा एकदा वणी तालुक्यात दाखल झाली आहे. मध्यंतरी तालुक्यातील घोन्सा येथील काही नागरिकांनी मुकूटबन पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर कारवाईच्या भीतीने ही टोळी भूमिगत झाली होती. मात्र ही टोळी वणी तालुक्यात पुन्हा दाखल झाली असून घोन्सा येथून मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण-घेवाणीचा व्यवहार सुरू असल्याची माहिती आहे.मायक्रो फायनान्स कंपन्यांपेक्षाही अतिशय घातक असलेल्या या टोळीविरुद्ध घोन्सा येथील काही जागृक नागरिकांनी मुकुटबन पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावेळी मुकुटबन येथील ठाणेदारांनी घोन्सा येथे येऊन तक्रारकर्ते व गावकºयांशी चर्चा करून कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र तक्रार केल्याची भनक लागताच, राजस्थानी सावकरांची ही टोळी पसार झाली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून या टोळीतील काही सदस्य घोन्सा येथे एका किरायाच्या खोलीत वास्तव्याला आहेत. एका गाव पुढाºयाच्या आश्रयाने या सावकारांचा गोरखधंदा सुरू असल्याची गावात चर्चा आहे.गरजू कष्टकºयांना हेरायचे. त्यांना पाच हजारांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज द्यायचे. एखाद्या दहा हजार रुपये कर्ज द्यायचे असेल तर त्याच्या हाती केवळ सात हजार रुपये दिले जातात. उर्वरित तीन हजार रुपयांत एक निकृष्ट दर्जाची ताडपत्री घेण्यास बाध्य केले जाते. ती आवश्यक नसली तरी कर्जदाराला ती पैशाच्या गरजेपोटी घ्यावी लागते. ताडपत्री न घेणाºयास कर्ज दिले जात नाही.मुळात सदर ताडपत्रीची किंमत बाजारात केवळ पाचशे रुपये आहे. मात्र तीच ताडपत्री कर्जदाराला तीन हजार रुपयांत दिली जाते. कर्ज दिल्यानंतर कर्जदाराच्या हाती शेतातील पिक येताच, कर्जदाराकडून दहा हजारांवरील व्याजासह १५ हजार रुपये उकळले जात आहेत. पोलीस यंत्रणा मात्र या विषयात मूग गिळून गप्प बसली आहे. परिणामी वणीसह झरी तालुक्यातील गरजूंची या सावकारांकडून अक्षरश: लूट केली जात आहे. या सावकारांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी केली जात आहे.देखाव्यासाठी सावकार बनले शेतकरीराजस्थानी सावकारांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल होताच, या सावकारांनी या भागात थांबण्यासाठी एक नवा फंडा अंगिकारला आहे. देखावा करण्यासाठी यांनी घोन्सा परिसरात तब्बल ४० एकर शेती भाडेतत्वावर केली आहे. त्यावर देखरेख करण्यासाठी घोन्सा येथील ‘अनिल’ नामक बेरोजगार युवकाची नेमणूक केली असून हा ‘अनिल’ सावकारांनी भाडेतत्वावर केलेल्या शेतीचे व्यवहार सांभाळत असून सोबतच कर्जदार ग्राहक पाहून देण्याचेही काम पाहत असल्याचे सांगण्यात येते.