शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

राज्यातील साडेआठशे शाळांच्या ‘अस्तित्वा’वर लागणार फुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 10:22 AM

राज्यात तब्बल २ हजार २५४ शाळांकडे यू-डायस क्रमांकच नसल्याची गंभीर बाब महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या निदर्शनास आली आहे.

ठळक मुद्दे२६७ शाळा बंद होणार यू-डायस क्रमांकासाठी धावाधाव

अविनाश साबापुरे।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : राज्यात तब्बल २ हजार २५४ शाळांकडे यू-डायस क्रमांकच नसल्याची गंभीर बाब महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या निदर्शनास आली आहे. यू-डायस क्रमांक नसलेल्या या शाळा शंभर टक्के अनधिकृत नसल्या तरी शिक्षण विभागाच्या दृष्टिकोनात त्या अस्तित्वहीन झाल्या आहेत. कोणतीही योजना राबविताना या शाळांचा विचार केला जात नाही. विशेष म्हणजे, यातील २६७ शाळांना आता यू-डायस क्रमांकही नाकारण्यात आल्याने त्या बंद होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने राज्यातील प्रत्येक शाळेला यू-डायस क्रमांक (युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन फॉर एज्युकेशन) घेणे बंधनकारक केले आहे. हा क्रमांक असलेल्या शाळांची संख्या विचारात घेऊनच केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना राबविल्या जातात. त्यामुळे प्रधान सचिव नंदकुमार यांनी प्रत्येक शाळेने यू-डायस क्रमांक मिळविण्याचे आदेश ७ आॅगस्ट रोजी दिले होते. विशेष म्हणजे, हा क्रमांक घेण्याची पद्धतीही सोपी करण्यात आली होती. १५ सप्टेंबरपूर्वी यू-डायस न घेतल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता.या आदेशाने राज्यातील संस्था चालकांचे धाबे दणाणले. अंतिम मुदत उलटून गेल्यावरही तब्बल २ हजार २५४ शाळांकडे यू-डायस नसल्याची बाब उघड झाली. या शाळांनी आॅनलाईन क्रमांक मिळविण्याची धडपड केली. मात्र, त्यातील २६७ शाळांना शिक्षणाधिकारी स्तरावरूनच झिडकारण्यात आले. ‘रिजेक्ट’ झालेल्या या शाळा सुरूच राहिल्यास संबंधित संस्थाचालकावर कायदेशिर कारवाई सुरू करण्याचे आदेश शिक्षण सचिवांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

राजधानीतच सर्वाधिक फसवाफसवीयू-डायस क्रमांक न घेताच कारभार करणाऱ्या सर्वाधिक ३०४ शाळा मुंबईमध्ये आढळल्या आहेत. शैक्षणिक माहेरघर अशी ओळख मिळविलेल्या शहरांमधील संस्थाचालकांनी मोठ्या प्रमाणात फसवाफसवी करत शाळा चालविल्याचे दिसते. कारण पुण्यात १९० तर औरंगाबादमध्ये १६७ इतक्या मोठ्या संख्येतील शाळांकडे यू-डायस क्रमांकच नाही. राजधानी जवळच असलेल्या ठाणे, रायगड, पालघरसारख्या जिल्ह्यात तब्बल ४७८ शाळा शिक्षण विभागाच्या दफ्तरी नोंदणीकृत नाहीत.जिल्हानिहाय बंद होणाऱ्या शाळाशिक्षणाधिकाऱ्यांनी यू-डायस क्रमांक नाकारल्याने राज्यात २६७ शाळा बंद होणार आहेत. त्यांची जिल्हानिहाय संख्या पुढील प्रमाणे आहे. नागपूर ३, अकोला १, अमरावती १, वर्धा ३, औरंगाबाद १५, बिड १६, जळगाव ३, जालना ११, कोल्हापूर १६, लातूर १, मुंबई ३८, नंदूरबार २, नाशिक १६, उस्मानाबाद ३, पालघर ६०, परभणी ३, पुणे ९, नत्नागिरी ९, सातारा १ सिंधुदुर्ग २, सोलापूर ३, ठाणे ५१. विशेष म्हणजे, यात विदर्भातील केवळ ६ शाळांचा समावेश असून यवतमाळ, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वाशीम जिल्ह्यातील एकही शाळा यू-डायसविना बंद होण्याची शक्यता नाही.

टॅग्स :educationशैक्षणिकSchoolशाळा