पुसद शहराला अनधिकृत फ्लेक्सने घातला विळखा

By Admin | Updated: February 26, 2016 02:18 IST2016-02-26T02:18:07+5:302016-02-26T02:18:07+5:30

शहरात अनधिकृत फ्लेक्सचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे शहराला बकाल स्वरुप प्राप्त होत आहे.

Pushad has been attacked by unauthorized flakes | पुसद शहराला अनधिकृत फ्लेक्सने घातला विळखा

पुसद शहराला अनधिकृत फ्लेक्सने घातला विळखा

नगर परिषदेकडून कारवाई नाही : शहराचे होत आहे विद्रुपीकरण
पुसद : शहरात अनधिकृत फ्लेक्सचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे शहराला बकाल स्वरुप प्राप्त होत आहे. अनधिकृत फ्लेक्सवर दररोज एक नवीन चेहरा झळकत असून, महसूलात घट होत आहे. याबाबत पालिकेकडून काय कारवाई करण्यात येते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुसद शहराचा विस्तार तीन किलोमीटर चौरस किमी आहे. परंतु हे क्षेत्रही सांभाळताना पालिका सभासदांच्या नाकी नऊ येत आहे. एकीकडे स्वच्छतेची ओरड सुरू असताना दुसरीकडे मात्र जागोजागी वाढत्या फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. या फ्लेक्सयुद्धात आकारानुसार दर भरावा लागतो. मध्यंतरी पालिकेने काही फ्लेक्सवर कारवाई केली होती. पालिका कारवाई करीत नसल्याचे बघून अनेक भाई व दादांना जाग आली आहे. त्यामुळे चौका-चौकात आणि गल्लीबोळात दबंगगिरी सुरू झाली. महात्मा फुले चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, नाईक चौक, आझाद चौक, आंबेडकर चौक, तहसील चौक, मुखरे चौक, मामा चौक या शहरातील मुख्य भागांमध्ये फ्लेक्सची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. नियमानुसार पालिकेकडून परवानगी घेतलेल्या फ्लेक्सवर दिलेल्या पावतीचा क्रमांक व कालावधी नमूद केलेला असतो. फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करून फ्लेक्स जप्त केले जातात. पुसद नगरपरिषदेकडून याबाबतची कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Pushad has been attacked by unauthorized flakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.