शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

पुसदच्या दोघांचे नगरसेवकपद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरले. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येथे शुक्रवारी धडकले. यात प्रभाग क्रमांक ‘अ’धून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख फिरोज शेख अफसर आणि प्रभाग क्रमांक ११ ‘अ’मधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या सीमा महाजन यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देजात प्रमाणपत्र अवैध । शिवसेना, राष्ट्रवादी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : २०१६ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत नागरिकांच्या मागास प्रवर्गातून विजयी झालेल्या दोन सदस्यांचे पद रद्द ठरविण्यात आले. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला झटका बसला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरले. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश येथे शुक्रवारी धडकले. यात प्रभाग क्रमांक ‘अ’धून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख फिरोज शेख अफसर आणि प्रभाग क्रमांक ११ ‘अ’मधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या सीमा महाजन यांचा समावेश आहे.या दोघाचेही नागरिकांचा मागास प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय जिल्हा जात पडताळणी समितीने २०१७ मध्ये दिला होता. त्या निर्णयाला कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिली नाही. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महाराष्ट्र न.प., न.पं. व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १६ पोटकलम १ (क), (ब) च्या तरतुदीनुसार दोन्ही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केले.त्या संबंधीचे आदेश शुक्रवारी येथे धडकले. या आदेशात सदस्यत्व रद्द झालेल्या नगरसेवकांना आगामी ६ वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढता येणार नसल्याचेही नमूद केले आहे.पक्षीय बलाबल प्रभावित होणारयेथील २९ सदस्यीय पालिकेत नगराध्यक्ष अनिताताई मनोहरराव नाईक यांच्यासह १२ सदस्य होते. भाजपकडे १०, काँग्रेस तीन, तर शिवसेनेकडे चार सदस्य होते. आता राष्ट्रवादी व शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य कमी झाला. त्यामुळे गेल्या ३ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जानेवारीत होणारी विषय समित्यांची निवडणूक जड जाण्याचे संकेत आहे. ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. त्यात महाविकास आघाडीचा प्रयोग होतो का, याची चाचपणी सुरू झाली आहे. मात्र शिवसेना बांधकाम समितीसाठी आग्रही राहण्याची शक्यता बळावली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका