पुसदच्या ९३ वर्षीय आजींची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:43 IST2021-04-01T04:43:33+5:302021-04-01T04:43:33+5:30

पुसद : संपूर्ण जगावर कोरोनाने घाला घातला आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. मात्र, येथील ९३ वर्षीय आजीने ...

Pusad's 93-year-old grandmother defeated Corona | पुसदच्या ९३ वर्षीय आजींची कोरोनावर मात

पुसदच्या ९३ वर्षीय आजींची कोरोनावर मात

पुसद : संपूर्ण जगावर कोरोनाने घाला घातला आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. मात्र, येथील ९३ वर्षीय आजीने काेरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे कोणी आपले वडील गमावले, कोणी आपली आई तर कोणी आपले संपूर्ण कुटुंब गमावले. मात्र, जगात असेही लोक आहेत की, कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर मात करून आपल्या घरी परतत आहेत. अशाच एका ९३ वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली. शहरातील नवीन पुसद येथे राहणाऱ्या प्रभावती काळीकर यांनी १० दिवसांत कोरोनवर मात करून घर गाठले.

घरातील सर्व सदस्य व यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व चमू आणि डॉक्टरांमुळे आपण सुखरूप घरे पाेहोचल्याचे त्या सांगतात. सर्वांनी योग्य काळजी घेतली, असे त्यांनी सांगितले. कोरोनाला घाबरू नका, तर या कठीण काळात सर्वांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रभावती काळीकर यांनी केले.

Web Title: Pusad's 93-year-old grandmother defeated Corona