पुसद-उमरखेड मार्गावर एसटी बसने अचानक घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 13:02 IST2019-11-07T12:55:39+5:302019-11-07T13:02:34+5:30
पुसदवरून उमरखेडकडे जाणारी मार्ग परिवहन महामंडळाची बस अचानक पेटल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

पुसद-उमरखेड मार्गावर एसटी बसने अचानक घेतला पेट
यवतमाळ : पुसदवरून उमरखेडकडे जाणारी मार्ग परिवहन महामंडळाची बस अचानक पेटल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. उमरखेड आगाराची ही एसटी बस (एम.एच.४०/एक्यू-६०९३) पुसदवरून उमरखेडकडे असताना बारा गावाच्या फाट्यानजीक अचानक त्यातून धूर निघत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. प्र
संगावधान राखून चालकाने सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरविले. घटनेची माहिती मिळताच उमरखेड नगरपरिषदेच्या अग्नीशमन विभागाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली. या घटनेमुळे प्रवाशांची मात्र घाबरगुंडी उडाली होती. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.