शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यामध्ये एका डॉक्टरसह सहा जणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाने ३७ क्षेत्र सील केले आहे. यात शहरातील व ग्रामीण भागातील क्षेत्रांचा समावेश आहे. शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. प्रशासनातर्फे वारंवार नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. शिवाय वारंवार हात स्वच्छ धुवावे, सामाजिक अंतर राखावे आदी सूचना दिल्या जात आहे. मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्याने नागरिक सूचनांचे पालन करताना दिसत नाही.

ठळक मुद्दे१२९ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह । ३८२ जणांची कोरोनावर मात, आतापर्यंत १७ जणांचे बळी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यात शनिवारी एका डॉक्टरसह सहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकूण अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२९ वर तर एकूण बाधितांची संख्या ५२८ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ३८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दररोज रुग्णसंख्येत भर पडत आहे. शनिवारी तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील एका डॉक्टरसह दोन व हिवळणी (पा) येथील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शुक्रवारी उशिरा रात्री शहरातील हनुमान वॉर्डातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे शनिवारी सायंकाळपर्यंत सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यामुळे तालुक्यातील अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १२९ वर पोहोचली आहे. तालुक्याचा एकूण कोरोना बाधितांचा आकडा ५२८ वर पोहोचला आहे.तालुक्यात सुरुवातीपासून आतापर्यंत ३८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र आतापर्यंत तब्बल १७ जणांचे कोरोनाने बळी गेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे.प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रशासनाने ३७ क्षेत्र सील केले आहे. यात शहरातील व ग्रामीण भागातील क्षेत्रांचा समावेश आहे. शहर व ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. प्रशासनातर्फे वारंवार नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. शिवाय वारंवार हात स्वच्छ धुवावे, सामाजिक अंतर राखावे आदी सूचना दिल्या जात आहे. मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्याने नागरिक सूचनांचे पालन करताना दिसत नाही.दुकाने व रस्त्यांवर नागरिकांची गर्दी होत आहे. यातून शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.सवनाची बाजारपेठ चार दिवस बंदमहागाव तालुक्यातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तालुक्यातील सवना येथे ३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे नागरिकांनी गाव स्वयंस्फूर्तीने चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. महागाव तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची तारांबळ उडत आहे. सवना गाव कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. तालुक्यातील पिंपळगाव येथील सूतगिरणीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. परिणामी तेथील कामगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या