शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

एकट्या पुसद तालुक्यात ५२२ कोरोनाबाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST

सध्या तालुक्यात १२३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर सुरुवातीपासून आतापर्यंत तालुक्यातील ५२२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. एकाच तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळल्याने यंत्रणा झपाट्याने कामाला लागली आहे. तर दुसरीकडे तब्बल १७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मात्र आतापर्यंत ३८२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देअ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह १२३ : १७ जणांचा मृत्यू तर ३८२ कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच असून जिल्ह्यात १६ तालुक्यांपैकी पुसद अतिसंवेदनशील तालुका बनला आहे. जिल्ह्यातील एकंदर तीन हजार कोरोनाबाधितांपैकी सुमारे साडेपाचशे रुग्णांची नोंद एकट्या पुसद तालुक्यात झाली आहे.गेल्या तीन दिवसात तब्बल ५६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी बुधवारी एकाच दिवशी २१ रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी एका पोलिसासह दोन तलाठी व एकंदर सहा जण पॉझिटिव्ह आढळले. गुरुवारी आरोग्य विभागाच्या पथकाने ६३ जणांची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट घेतली असता हिवळणी आणि शेंबाळपिंपरी येथील दोन तलाठी व शेलू येथील एक पुरुष, शहरातील लोहार लाईनमधील दोन पुरुष, तर शुक्रवारी पोलीस वसाहतीत राहणारा मात्र दराटी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी असे सहा जण नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळले. इतर ६१ जण निगेटिव्ह आले आहेत. तालुक्यातील वालतूर रेल्वे येथील ७३ नागरिकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. हे नमुने यवतमाळला तपासणीकरिता पाठविल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी दिली.सध्या तालुक्यात १२३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर सुरुवातीपासून आतापर्यंत तालुक्यातील ५२२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. एकाच तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळल्याने यंत्रणा झपाट्याने कामाला लागली आहे. तर दुसरीकडे तब्बल १७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मात्र आतापर्यंत ३८२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.तालुका प्रशासन म्हणते, सतर्कता बाळगापुसद शहर आणि तालुक्यातील कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. दररोज नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या