शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

पुसद रिलिफ फंडाची पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 5:00 AM

पूरग्रस्त कुटुंबीयांना पुसद रिलीफ फंडच्या वतीने तब्बल तेरा लाख रुपयांच्या गृहोपयोगी साहित्याची मदत देण्यात आली. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून साहित्याच्या ट्रकला भगवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

ठळक मुद्देगृहोपयोगी वस्तू रवाना : कर्मचारी आणि सर्वसामान्यांची माणुसकी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्त कुटुंबीयांना पुसद रिलीफ फंडच्या वतीने तब्बल तेरा लाख रुपयांच्या गृहोपयोगी साहित्याची मदत देण्यात आली. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून साहित्याच्या ट्रकला भगवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यवतमाळ विभाग संघचालक प्रा. सुरेश गोफने, आमदार निलय नाईक, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, डॉ. मोहंमद नदीम, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सूरज डुबेवार, नगरसेवक निशांत बयास, धनंजय अत्रे, विनोद जिल्हेवार, उमाकांत पापीनवार, निखिल चिद्दरवार, विजय जाधव, गिरीश अग्रवाल, अशोक बाबर, राजू साळुंखे उपस्थित होते. पुसद अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक २ लाख ४४ हजार ५०९ रुपये, शहरातील मदत रॅलीमध्ये २ लाख ११ हजार, भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेने ५१ हजार रुपये व भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी २६ हजार रुपये, सर्व शैक्षणिक संस्था ८१ हजार ९४६ रुपये, विश्वनाथसिंग बयास पतसंस्था ५१ हजार, मुस्लिम समाजाच्या वतीने ५६ हजार, पिडीए ४३ हजार, शहर पोलीस ठाण्याच्या वतीने ३१ हजार, औषध विक्रेता संघ ३१ हजार रुपये, कापड विक्रेता संघ २१ हजार, वत्सलबाई नाईक महिला महाविद्यालय २० हजार ३७० रुपये या मोठ्या रकमांसमवेत ४-५ अंकी रकमा मदत स्वरूपात मिळाल्या आहेत.सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याचा सर्वे करण्यात आला. त्याअंती सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील धनगाव, संतगाव, बोरबन, सूर्येगाव व भुवनेश्वरवाडी या पाच गावी तब्बल ८५० किट वितरित केल्या जाणार आहेत. साहित्य भरलेल्या ट्रकला भगवी झेंडी दाखविताना विजय जाधव, अभय गडम, जिल्हा परिषद सदस्य अमेय नाईक, विश्वास भवरे, नितीन पवार, प्रवीर व्यवहारे, पुंडलिक शिंदे, राहुल कांबळे, शेख कयूम, मनिष अनंतवार, डॉ. पंकज जयस्वाल, श्रीराम पवार, नारायण पाटील मुडानकर, यशवंतराव चौधरी, सुनील भालेराव, एम.आर. राठोड, ओमप्रकाश शिंदे, सुशांत महाले उपस्थित होते.पाच गावे दत्तकपुसद रिलीफ फंडने सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कृष्णा नदीकाठी वसलेली धनगाव, संतगाव, बोरबन, सूर्येगाव व भुवनेश्वरवाडी ही पाच गावे दत्तक घेतली आहेत.साडेआठशे किट४ ताट, ८ वाट्या, ४ ग्लास, ४ प्लेट, २ गंज, १ पळी, १ बकेट, २ सोलापुरी चादर असे दैनंदिन गृहोपयोगी साहित्य समाविष्ठ असलेल्या भरीव साडेआठशे किट पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आल्या.

टॅग्स :Socialसामाजिक