पैनगंगा नदीवर लोकसहभागातून बांधला पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST2019-12-17T05:00:00+5:302019-12-17T05:00:16+5:30
उमरखेड तालुक्यातील दिवट पिंपरी आणि मराठवाड्यातील हदगाव तालुक्यातील साप्ती गावाचा दैनंदिन संबंध येतो. गावांच्या मधातून पैनगंगा नदी वाहते. नदीवर पूल नसल्याने दोन्ही तीरांवरील नागरिकांची तारांबळ उडते. अनेकदा मागणी करूनही प्रशासनाने पूल बांधला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील निवघा, साप्ती, कान्हळी, शिरड, हदगाव, कोळी, धानोरा या गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. उमरखेड तालुक्यातील अनेक गावांना त्रास होतो.

पैनगंगा नदीवर लोकसहभागातून बांधला पूल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुळावा : परिसरातील दिवट पिंपरी व मराठवाड्यातील साप्ती गावादरम्यान पैनगंगा नदी वाहते. नदीवर लोकसहभागातून पूल बांधला जात आहे.
उमरखेड तालुक्यातील दिवट पिंपरी आणि मराठवाड्यातील हदगाव तालुक्यातील साप्ती गावाचा दैनंदिन संबंध येतो. गावांच्या मधातून पैनगंगा नदी वाहते. नदीवर पूल नसल्याने दोन्ही तीरांवरील नागरिकांची तारांबळ उडते. अनेकदा मागणी करूनही प्रशासनाने पूल बांधला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील निवघा, साप्ती, कान्हळी, शिरड, हदगाव, कोळी, धानोरा या गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. उमरखेड तालुक्यातील अनेक गावांना त्रास होतो.
जनतेची अडचण लक्षात घेऊन जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांच्या मार्गदर्शनात ग्रामस्थांनीच आता नदीवर लोकसहभागातून पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी उत्स्फूर्तपणे नागरिक श्रमदान करीत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव कदम कोहळीकर, दयानंद कदम, व्यंकटराव कदम, शामराव कदम, कबीरदास कदम, प्रशांत पतंगे, विश्वनाथ लगळूदकर, सुभाष कदम यांच्यासह ग्रामस्थ श्रमदानात सहभागी होत आहे.