पंचनामा यादीप्रमाणे मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 22:14 IST2019-09-29T22:14:09+5:302019-09-29T22:14:29+5:30
शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पुराने खरडून गेल्या होत्या. तलाठी व कृषीसेवक यांनी पंचनामा करून यादी तयार केली होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांना खरडीचा मोबदला मिळाला नाही. आता मोबदला मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र शिवणी येथील शेतकºयांना आश्चर्याचा धक्का बसला.

पंचनामा यादीप्रमाणे मदत द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तालुक्यातील शिवणी येथील नाल्याला गेल्यावर्षी पूर आला होता. यात नाल्या लगतच्या शेतीतील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना मूळ पंचनामा यादीनुसार मदत द्यावी, अशी मागणी तेथील पूरग्रस्तांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पुराने खरडून गेल्या होत्या. तलाठी व कृषीसेवक यांनी पंचनामा करून यादी तयार केली होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांना खरडीचा मोबदला मिळाला नाही. आता मोबदला मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र शिवणी येथील शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण ज्यांचे नुकसान झाले त्या खऱ्या व पिडीत शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला आणि ज्यांचे काहीही नुकसान झाले नाही, अशांना भरपूर मोबदला दिला जात आहे.
मोबदला वाटपात विसंगती असल्याने शेतरी संतापले आहे. पंचनामा यादीत गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे पंचनाम्याच्या मूळ यादीनुसार मदत निधी वाटप करावा, अशी मागणी शिवणी येथील पुरबाधीत शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. नाल्या काठावरच्या शेतकऱ्यांची शेती पिकासह खरडून गेली. मात्र खºया नुकसानग्रस्तांना केवळ ३ ते ४ हजार रुपये आणि ज्यांचे कमी नुकसान झाले त्यांना १५ ते १८ हजारांचा निधी दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तहसीलदार राजेश वझिरे यांना निवेदन देताना महादेव राऊत, विजय आरेकर, मुकुंद नागमिते, महादेव खद्रे, संतोष खद्रे, हिरामण राठोड, अशोक आरेकर, गणेश जाधव, प्रेमसिंग राठोड, बाबूसिंग राठोड, राजू आरेकर आदी पूरबाधित उपस्थित होते.