संविधान जाळणाऱ्यांचा सर्वत्र निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 09:53 PM2018-08-13T21:53:04+5:302018-08-13T21:53:26+5:30

राजधानी दिल्लीत क्रांतीदिनी संविधान जाळण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळातील विविध सामाजिक संघटनांनी सोमवारी निषेध रॅली काढली. दोषी समाजकंटकांवर कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले.

Prohibition of Constitutional burners everywhere | संविधान जाळणाऱ्यांचा सर्वत्र निषेध

संविधान जाळणाऱ्यांचा सर्वत्र निषेध

Next
ठळक मुद्देयवतमाळात निषेध रॅली : विविध सामाजिक संघटनांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राजधानी दिल्लीत क्रांतीदिनी संविधान जाळण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळातील विविध सामाजिक संघटनांनी सोमवारी निषेध रॅली काढली. दोषी समाजकंटकांवर कारवाईसाठी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले.
९ आॅगस्टला दिल्लीमधील जंतरमंतर मैदानावर काही समाजकंटकांनी संविधानाच्या प्रती जाळल्या. आक्षेपार्ह नारेबाजी केली. अशा समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर काँग्रेस कमेटी, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, समतापर्व प्रतिष्ठान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था यासह विविध संघटनांतर्फे करण्यात आली.
यावेळी शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, उपाध्यक्ष अरूण ठाकूर, विशाल पावडे, शब्बीर खान, संतोष ढगे, उषा दिवटे, पल्लवी रामटेके, तर कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष सिध्दार्थ भवरे, राजू सूर्यवंशी, प्रवीण गोबरे, सतीश गाडगे, नंदराज गुर्जर, शीतल वानखडे, अनिल सदाशिव, गिरीधर भगत तर समतापर्व प्रतिष्ठानच्या वतीने दीपक नगराळे, अंकुश वाकडे, अशोक वानखडे, नारायण स्थुल, जनार्धन मनवर, मिनाक्षी सावळकर, राजा गणवीर, सोपान कांबळे, संध्या भगत, रत्नमाला कांबळे, कांता भगत, अलका अढाव, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने निवेदन देतेवेळी अ‍ॅड. सोपानराव कांबळे, नामदेव स्थुल, डी. के. भगत, टी. एन. मेश्राम, एन. सी. भगत आदी उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर लॉयर्स असोसिएशनतर्फे अ‍ॅड. जयसिंह चव्हाण, समता सैनिक दलातर्फे संदीप कोटंबे, रिपार्इं (ए)तर्फे नवनित महाजन, संभाजी ब्रिगेडतर्फे सूरज खोब्रागडे, डॉ. आंबेडकर मित्र परिवार तर्फे सावन चौधरी, महादलित परिसंघ, मेहतर युवा संघटनेतर्फे सचिन व्यास, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संघर्ष समितीचे सागर कळणे, बुद्धीस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे रवींद्र टेंभुर्णे, फुले आंबेडकरी साहित्य संसदेचे किशोर भगत, भीमशक्ती संघटनेतर्फे अनिल चवरे, गुरु रविदास चर्मकार सेवासंघातर्फे लक्ष्मण वानखडे, संविधान विचार मंच तर्फे दत्तात्रय सूर्यवंशी तसेच रवी धाकडे, अंकुश वाकडे, योगानंद टेंभुर्णे, प्रा. दातार, सोनू राऊत, विजय टेंभुर्णे, विवेक वानखडे आदी उपस्थित होते.
कळंब ठाणेदारांना निवेदन
कळंब : दिल्लीतील जंतरमंतर येथे भारतीय संविधान जाळण्यात आले. याप्रकाराचा निषेध करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी ठाणेदार नरेश रणधीर यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर ओमप्रकाश भवरे, संजय वानखडे, प्रतीक भुजाडे, करण मून, दिनेश चिमुरकर, रोशन झामरे, अरविंद मेश्राम, मधुकर अलोणे, संजय वानखडे, एस.बी. कांबळे, एम.एस. जुमनाके, विवेक देशमुख, भगवंत डेरे, रोशन थूल, जगदीश भेले, उमेश नरगडे, नीलेश हजारे, पंढरी कांबळे, जावेद खान, सुगत नारायणे, चुडामन कांबळे, मधुकर खैरकार, मुकुंद थोरात, मिलिंद पाटील, संजय खैरकार, उदय कदम आदींच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: Prohibition of Constitutional burners everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.