शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हात शेतमालाची खासगी खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:39 IST

शहर तसेच ग्रामीण भागात खुलेआमपणे सुरू असलेली शेतमालाची खासगी खरेदी पूर्णत: बंद करण्यात आली. बाजार समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच हा चमत्कार घडला असून या ऐतिहासिक निर्णयाचा शेतकरी आणि बाजार समितीला मोठा लाभ होणार आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक निर्णय : सहायक निबंधकांचे प्रयत्न फळाला, शेतकऱ्यांना दिलासा

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहर तसेच ग्रामीण भागात खुलेआमपणे सुरू असलेली शेतमालाची खासगी खरेदी पूर्णत: बंद करण्यात आली. बाजार समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच हा चमत्कार घडला असून या ऐतिहासिक निर्णयाचा शेतकरी आणि बाजार समितीला मोठा लाभ होणार आहे.येथील सहाय्यक निबंधक प्रेम राठोड यांनी या बदलासाठी प्रयत्न केले. व्यापाºयांबाबत त्यांनी कठोर भूमिका घेतली. त्यामुळे आता सर्व शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार केवळ बाजार समितीच्या प्रांगणात होत आहे. १९२१ मध्ये येथे बाजार समितीच्या स्थापननंतर खरेदी-विक्रीचे व्यवहार मार्केट यार्डमध्ये सुरू झाले. मात्र बाहेरसुद्धा व्यापारी खरेदी करीत होते. कापूस उत्पादक पणन महासंघाचा एकाधिकार संपुष्टात आल्यानंतर बाजार समितीच्या ‘सेस’वर मोठा परिणाम झाला. तसेच इतर शेतमालाचीसुद्धा खरेदी बाहेर होत असल्याने बाजार समिती अडचणीत आली होती.अलीकडे व्यापाऱ्यांनी खुलोम दुकाने थाटून शेतमालाची खासगी खरेदी सुरू केली. बाजार समितीत एका दाण्याचासुद्धा व्यवहार होत नव्हता. याचा मोठा परिणाम शहराच्या बाजारपेठेवर झाला. खेडा खरेदीसुद्धा वाढली. खासगी खरेदीत शेतमालाचे दर आणि वजनात शेतकऱ्यांची लूट सुरू झाल्यानंतर खासगी खरेदी बंदसाठी भरपूर प्रयत्न झाले. मात्र हा प्रकार बंद करण्यात कुणालाही यश आले नाही.यावर्षी येथील सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) प्रेम राठोड यांनी कठोर भूमिका घेतली. त्यांनी प्रथम व्यापाऱ्यांच्या दुकानावर धडक देऊन त्यांचे रेकॉर्ड ताब्यात घेतले. तपासणी केली असता बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या रेकॉर्डमध्ये मोठी तफावत आढळली. नंतर त्यांनी खासगी खरेदी बंद करण्याचा विडा उचलला. सुरुवातीला बाजार समितीचे प्रशासक जी.एस.कुमरे यांच्यासह सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत खासगी दुकान व गोदाम बंद करून व्यापाऱ्यांनी मार्केट यार्डमध्येच शेतमालाची खरेदी करावी, खरेदी-विक्रीचे रेकॉर्ड ठेवावे, ट्रेडिंग कंपनीचे बोर्ड लावू नये, अशा सूचना दिल्या. यार्डमध्ये शेतमाल खरेदी करताना शेतकऱ्यांना २४ तासांत मालाचा चुकारा द्यावा, नियमानुसार हमाली, मापाई व तोलाई कपात करावी, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दिवसातून दोनदा हर्रास करावा, अशाही सूचना दिल्या. सूचनांचे पालन न झाल्यास कारवाईचा इशारा दिला.यानंतर राठोड यांनी दुकानांमध्ये सरप्राइज व्हिजीट तसेच ग्रामीण भागात दौरे करून खेडा खरेदी बंद केली. आता संपूर्ण व्यवहार बाजार समितीच्या यार्डमध्ये होत आहे. त्यामुळे शेतकºयांसह समितीला लाभ होत आहे. समितीचा सेसही वाढणार आहे.बाजार समितीला सेस, शेतमालाला भावशेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बाजार समितीच्या यार्डमध्ये व्हायला लागल्यामुळे ‘सेस’मध्ये मोठी वाढ होणार आहे. मागीलवर्षी कापूस व धान्य मिळून केवळ पाच लाख २१ हजार ८५० रुपये सेसपोटी मिळाले. यावर्षी यात चौपट वाढ होऊन २० लाखांच्यावर सेस मिळेल, असे सांगीतले जाते. सोयाबीनला खुल्या बाजारात प्रति क्विंटल दोन हजार ५०० ते दोन हजार ६०० रुपये दर मिळत होता. आता लिलावात तीन हजार २०० रुपये दर मिळत आहे. कापूसही ४५०० रुपयांवरून ५६०० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या २८ महिन्यांपासून समितीच्या कर्मचाºयांचा पगार झाला नाही. मात्र आता समितीच्या उत्पन्नात वाढ होऊन हा प्रश्न मिटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती