खासगी बसला आग, २५ प्रवासी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 22:02 IST2017-12-24T22:02:28+5:302017-12-24T22:02:54+5:30
कोल्हापूरवरून नागपूरला जाणाऱ्या खासगी बसला महागाव तालुक्यातील मुडाणाजवळ रविवारी पहाटे १.३० वाजता अचानक आग लागली. आगीत बस जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील २५ प्रवासी बचावले.

खासगी बसला आग, २५ प्रवासी बचावले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुडाणा : कोल्हापूरवरून नागपूरला जाणाऱ्या खासगी बसला महागाव तालुक्यातील मुडाणाजवळ रविवारी पहाटे १.३० वाजता अचानक आग लागली. आगीत बस जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील २५ प्रवासी बचावले.
कोल्हापूरवरून अनुराग ट्रॅव्हल्स (एम.एच.०४/एफ.के.१४७५) रविवारी पहाटे नागपूरकडे जात होती. मुडाणाजवळ बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघताना चालक विजय खराटे यांना दिसला. चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला उभी केली. सर्व २५ प्रवाशांना बसच्या खाली उतरविले. काही वेळातच बसने पेट घेतला. उमरखेडच्या अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. अग्निशाकदल पोहचण्यापूर्वीच संपूर्ण बस जळून खाक झाली. महागाव पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. या आगीत सुमारे तीस लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.