शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रधान सचिवा पुढे जिल्हा बँक पदभरती प्रकरणात सुनावणी; बँक सीईओंना हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:44 IST

Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पदभरतीवरून सातत्याने तक्रारी करण्यात आल्या. त्यावरून वारंवार सूचना सहकार विभागाने दिल्या. प्रकरण थेट उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पदभरतीवरून सातत्याने तक्रारी करण्यात आल्या. त्यावरून वारंवार सूचना सहकार विभागाने दिल्या. प्रकरण थेट उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले. न्यायलयाच्या आदेशावरून याबाबत सहकार आयुक्तांनी चौकशी करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यावरून सहकार आयुक्तांच्या स्तरावरून चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार सहकार विभागाचे प्रधान सचिवांनी ३० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता मंत्रालयातील दालनात सुनावणी ठेवली आहे. यानंतर बँकेतील पदभरतीचे भवितव्य ठरणार आहे.

जिल्हा बँकेत पदभरती घेण्यात येऊ नये, अशी तक्रार आमदार बाळासाहेब मांगूळकर, संतोष बोरेले यांनी सहकार विभागाकडे केली. तसेच याबाबत उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावरून पदभरतीसाठी नियुक्त एजन्सीसह सर्वच प्रक्रियांची पुन्हा चौकशी करण्यात आली. आता त्या अहवालावरून सुनावणी घेतली जात आहे. बँकेत मोठ्या प्रमाणात विविध शाखांमध्ये आर्थिक गैरप्रकार झाला आहे. बँकेचा एनपीए ५१ टक्क्यांच्या पुढे असताना पदभरती प्रक्रिया घेणे नियमात बसणारे नाही, अशा आक्षेप तक्रारीतून घेण्यात आला होता. त्यांनतर आलेल्या निर्बंधाविरोधात बँक व कंत्राट मिळालेल्या एजन्सीने न्यायलयात धाव घेतली होती. न्यायलयाने या प्रकरणात सहकार सचिवांनी चौकशी करून निर्णय घेण्याचा आदेश केला होता. 

त्यावरून नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात प्रधान सचिवांनी सुनावणी घेतली. दोन्ही बाजू ऐकून घेण्यात आल्या. यादरम्यान सहकारी बँक भरतीबाबत अनेक तक्रार प्राप्त झाल्या, याची पडताळणी केल्यानंतर हा विषय सखोल चौकशीचा असल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे प्रधान सचिवांनी सहायक आयुक्त सहकारी संस्था पुणे यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती तयार केली. या समितीने २६ जानेवारी रोजी चौकशी अहवाल सादर केला. आता या अहवालावर आयबीपीएस, टीसीएल, एमकेसीएल या एजन्सीच्या प्रतिनिधींना व तक्रारदार यांना बाजू मांडण्याची शेवटी संधी दिली जाणार आहे. यानंतर बँकेतील नोकर भरतीचा निर्णय होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hearing on District Bank recruitment case before Principal Secretary; CEO summoned.

Web Summary : A hearing regarding alleged irregularities in district bank recruitment is scheduled before the Principal Secretary. The decision follows court orders and complaints about the recruitment process amidst financial concerns and high NPA. A committee report will be reviewed before the final decision.
टॅग्स :Yavatmalयवतमाळbankबँक