प्रधानमंत्री आवास योजना कार्यशाळा

By Admin | Updated: September 5, 2016 00:58 IST2016-09-05T00:58:58+5:302016-09-05T00:58:58+5:30

येथील बचत भवनात प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

Prime Minister's Housing Scheme Workshop | प्रधानमंत्री आवास योजना कार्यशाळा

प्रधानमंत्री आवास योजना कार्यशाळा

दारव्हा : येथील बचत भवनात प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड तर प्रमुख उपस्थितीमध्ये सुषमा गावंडे उपसभापती पंचायत समिती दारस्हा, संगीता इंगोले जिल्हा परिषद सदस्य, पंढरीनाथ सिंहे जिल्हा परिषद सदस्य, अमोल राठोड जिल्हा परिषद सदस्य, उमा ठक, जयश्री मिरासे, माणिक राठोड, विठोबा कसंबे, प्रकल्प संचालक विजय ठमके, कृषी अधिकारी राजीव शिंदे आदींचा समावेश होता.
तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात याद्यांमध्ये अनेक त्रुट्या होत्या. तसेच सदर योजनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम होता. या कार्यशाळेद्वारे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांना सविस्तर माहिती देण्यात आली. प्रास्ताविक गटविकास अधिकारी संजय गुहे यांनी केले. पालकमंत्री संजय राठोड यांनी एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये याची काळजी कर्मचाऱ्यांनी घेण्याच्या सूचना दिल्या. कार्यशाळेला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Prime Minister's Housing Scheme Workshop