दारव्हा, पुसद, महागावात दमदार पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 05:00 IST2021-06-10T05:00:00+5:302021-06-10T05:00:21+5:30
तालुक्यात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे माळपठारावरील गावे वगळता इतर भागांतील भोजला, शेलू खुर्द, रंभा, पिंपळगाव, येरंडा, चोंढी, बान्सी, पार्डी, निंबी, आदी परिसरांना तडाखा दिला. शेकडो हेक्टर जमिनीवर पाणी साचले. नदी-नाल्यांना पूर आले. या पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर जमीन खरडून गेल्याचा कयास आहे.

दारव्हा, पुसद, महागावात दमदार पावसाची हजेरी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात बुधवारी पावसाने पुन्हा दमदार एन्ट्री केली. सर्वाधिक पाऊस दारव्हा तालुक्यात ३७.९ मिमी इतका कोसळला. त्या खालोखाल पुसदमध्ये ३३.७ मिमी, महागावमध्ये २२ मिमी, तर यवतमाळ तालुक्यात २४.६ मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात १५.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुसद तालुक्यातील काही गावांना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाने तडाखा दिला. या पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर जमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
तालुक्यात बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. जवळपास दोन तास मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे माळपठारावरील गावे वगळता इतर भागांतील भोजला, शेलू खुर्द, रंभा, पिंपळगाव, येरंडा, चोंढी, बान्सी, पार्डी, निंबी, आदी परिसरांना तडाखा दिला. शेकडो हेक्टर जमिनीवर पाणी साचले. नदी-नाल्यांना पूर आले. या पावसामुळे जवळपास १५०० हेक्टर जमीन खरडून गेल्याचा कयास आहे.
वादळ व पावसामुळे पुसद ते दिग्रस मार्गावरील वाहतूकही काही काळ खोळंबली होती. पार्डी येथील नाल्याला पूर आला होता. त्यामुळे पार्डी ते जांबबाजार रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली होती. तालुक्यातील शेलू खुर्द येथील नाल्यालाही पूर आला. त्यामुळे बान्सी ते चोंढी या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवारीसुद्धा पावसाने तालुक्याला तडाखा दिला होता.
शेती नुकसानाच्या पंचनाम्याची मागणी
- बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली. शेतकऱ्यांनी नुकतीच खरिपासाठी मशागत केली होती. नांगरणी आणि वखरणी केलेली माती पावसाने वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर बिकट संक़ट उभे ठाकले आहे. प्रशासनाने या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज, गुरुवारी पंचनामे होण्याची शक्यता आहे.