एक लाख अ‍ॅन्टीजेन किट खरेदी करण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 05:00 AM2020-09-09T05:00:00+5:302020-09-09T05:00:15+5:30

पाच महिन्यात ५६ हजार ४७२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत चार हजार ३९२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. यातील ३१४० व्यक्ती बऱ्याही झाल्या आहेत. तपासण्यांमध्ये राज्यात टॉप फाईव्ह जिल्ह्यात यवतमाळची नोंद झाली आहे. आता संसर्गाचा वेग तिपटीने वाढला आहे. गत सात दिवसात ११०२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर ३७ रूग्णाचा सात दिवसात मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रूग्णाचा वेग आता ६.५ पर्यंत वाढला आहे.

Preparing to buy one lakh antigen kits | एक लाख अ‍ॅन्टीजेन किट खरेदी करण्याची तयारी

एक लाख अ‍ॅन्टीजेन किट खरेदी करण्याची तयारी

Next
ठळक मुद्देकन्टेन्मेंट झोनमध्ये सज्जता : वयोवृद्ध व्यक्तीवर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी आणखी एक लाख अ‍ॅन्टीजेन किट मागविण्यात येणार आहे. कन्टेन्मेंट झोनमधील प्रत्येकाची यामाध्यमातून तपासणी केली जाणार आहे.
पाच महिन्यात ५६ हजार ४७२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत चार हजार ३९२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. यातील ३१४० व्यक्ती बऱ्याही झाल्या आहेत. तपासण्यांमध्ये राज्यात टॉप फाईव्ह जिल्ह्यात यवतमाळची नोंद झाली आहे. आता संसर्गाचा वेग तिपटीने वाढला आहे. गत सात दिवसात ११०२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर ३७ रूग्णाचा सात दिवसात मृत्यू झाला. पॉझिटिव्ह रूग्णाचा वेग आता ६.५ पर्यंत वाढला आहे. ही स्थिती पाहता आता तत्काळ उपाययोजनांची गरज आहे.
यासंदर्भात केंद्र शासनाने खबरदारीच्या सूचना सर्वच राज्यांना दिल्या आहेत. प्रत्येकाची टेस्ट करण्याच्या सूचना आहेत. केंद्र शासनाच्या या आदेशाचे पालन करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने एक लाख अ‍ॅन्टीजेन किट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून २५ टक्के निधी वळता करण्याचे निर्देश आहेत. खनिकर्म विभागाच्या कर शुल्कातून आणि जिल्हा परिषदेच्या फंडाचा वापर केला जाणार आहे. खास करून ६५ वर्षावरील व्यक्तींच्या तपासणीवर भर राहणार आहे. शस्त्रक्रिया झालेले, बीपी, शुगर आणि इतर आजाराच्या व्यक्तींच्या त्यात नोंदी घेतल्या जाणार आहे.

मुख्याधिकारी करणार नियंत्रण
मुख्याधिकारी, तहसीलदार आणि आरोग्य विभागाची यंत्रणा काम करणार आहे. यात दर दिवसाला जिल्ह्यात ४०० अ‍ॅन्टीजेन टेस्ट आणि ४०० आरटीपीसीआर (रिअल टाईम पॉलिमरेस चेन रिअ‍ॅक्शन) चाचण्या केल्या जाणार आहेत. यानुसार जिल्ह्यात दर दिवसाला ८०० चाचण्या घेतल्या जाणार आहे.

आयसीएमआरचे विशेष लक्ष
इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कोरोना काळात काय उपाययोजना करायच्या आणि पुढील तपासण्या कशा पार पाडायच्या याबाबत कळविले आहे. यवतमाळ जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या चाचण्यावर यवतमाळात इतर जिल्ह्याच्या तुलनेत अल्प खर्च झाला आहे. यामुळे सर्वाधिक किट खरेदी यवतमाळला बंधनकारक राहणार आहे.

जिल्ह्यात एक लाख अ‍ॅन्टीजेन किट खरेदी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विविध विभागाचा निधी त्याकरिता वापरला जाणार आहे. यातून आरोग्याच्या खबरदारीच्या उपाययोजना पार पडणार आहे.
- एम.डी. सिंह
जिल्हाधिकारी, यवतमाळ

Web Title: Preparing to buy one lakh antigen kits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.