खावटीचा दावा केल्याने गर्भवती पत्नीचा खून

By Admin | Updated: August 24, 2014 23:46 IST2014-08-24T23:46:02+5:302014-08-24T23:46:02+5:30

शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विभक्त राहणाऱ्या विवाहितेने पतीविरुद्ध न्यायालयात खावटीचा खटला भरला. त्यावर संतप्त झालेल्या पतीने गर्भातील बाळाची पर्वा न करता तिच्यावर चाकूचे

Pregnant wife's murder by making a claim | खावटीचा दावा केल्याने गर्भवती पत्नीचा खून

खावटीचा दावा केल्याने गर्भवती पत्नीचा खून

दारव्हा : शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून विभक्त राहणाऱ्या विवाहितेने पतीविरुद्ध न्यायालयात खावटीचा खटला भरला. त्यावर संतप्त झालेल्या पतीने गर्भातील बाळाची पर्वा न करता तिच्यावर चाकूचे वार करून खून केला, अशी कबुली पोलिसांपुढे शरणागती पत्करल्यानंतर मारेकरी पतीने दिली. दरम्यान त्याला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला २८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
साजीदा परवीन आरिफ खान (२५) या गर्भवती पत्नीचा पती आरिफ खान आझाद खान (२७) रा. दिग्रस याने शनिवारी रात्री निर्घृण खून केला होता. दारव्हा येथील मौताब खान यांची कन्या असलेल्या साजिदाचा विवाह आरिफ खान सोबत झाला होता. या दाम्पत्याला चार वर्षाची मुलगी आहे. सुखाने संसार सुरू असताना पती आरिफ खान साजिदाला प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास देत होता. त्यातच ती गर्भवतीही होती. रोजच्या या प्रकाराला कंटाळून तिने दारव्हा येथे माहेरी आश्रय घेतला. तेव्हापासून ती वडिलांकडेच राहत होती. दरम्यानच्या काळात तिने पतीपासून खावटी मिळावी यासाठी न्यायालयात धाव घेतली. नेमका हाच राग धरुन त्याने शनिवारी रात्री पत्नीचा खून केला. घटनेच्या दिवशी आरोपी आसिफ सायंकाळी ७ वाजता दारव्हा येथे आला होता. मुलीसोबत भांडण असतानाही जावयाचा मानसन्मान केला. चहापानानंतर जेवणाची तयारी सुरू होती. त्यावेळी आरिफ खान आपली पत्नी साजिदासोबत चर्चा करीत होता. चर्चेत अडथळा नको म्हणून वडील बाहेर गेले. त्यानंतर मात्र पतीने साजिदासोबत वाद घालणे सुरू केले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, कोणताही विचार न करता गर्भवती पत्नीच्या पोटात चाकूने वार केले. त्याने घटनास्थळावरून पळ काढला आणि पोलिसात आत्मसमर्पण केले. इकडे साजिदाला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी आरिफविरुद्ध गुन्हा नोंदविला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Pregnant wife's murder by making a claim