पतीनेच केला गर्भवती पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST2019-12-30T06:00:00+5:302019-12-30T06:00:03+5:30

शायिस्ता परवीन अन्सार खान पठाण (२२) असे मृत गर्भवती पत्नीचे नाव आहे. तर अन्सार खान दिवान खान पठाण (२५) असे आरोपी पतीचे नाव आहे. शनिवारी रात्री घरगुती वादातून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या वादात पतीने पत्नीच्या डोक्यात घातक शस्त्राने वार केला. त्यात पत्नी जागीच ठार झाली. घटनेनंतर आरोपी पती पसार झाला.

Pregnant wife murdered by husband | पतीनेच केला गर्भवती पत्नीचा खून

पतीनेच केला गर्भवती पत्नीचा खून

ठळक मुद्देपुसद तालुक्यातील घटना : आरोपी पसार, पोलीस आरोपीच्या शोधात

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : तालुक्यातील बोरी (खुर्द) येथे घरगुती वादातून पतीने गर्भवती पत्नीचा खून केला. ही घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
शायिस्ता परवीन अन्सार खान पठाण (२२) असे मृत गर्भवती पत्नीचे नाव आहे. तर अन्सार खान दिवान खान पठाण (२५) असे आरोपी पतीचे नाव आहे. शनिवारी रात्री घरगुती वादातून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या वादात पतीने पत्नीच्या डोक्यात घातक शस्त्राने वार केला. त्यात पत्नी जागीच ठार झाली. घटनेनंतर आरोपी पती पसार झाला. बोरी (खुर्द) येथील रहिवासी अन्सार खान पठाण याचे गेल्या एप्रिलमध्ये उमरखेड येथील शायिस्ता परवीन हिच्या सोबत लग्न झाले होते. मात्र लग्नापासूनच त्यांच्यात खटके उडत होते. त्यामुळे पत्नी शायिस्ता परवीन उमरखेड येथे माहेरी राहत होती. शनिवारी अन्सार खान सासूरवाडीला गेला त्याने सासू-सासऱ्यांची भेट घेऊन जेवण केल्यानंतर पत्नीला बोरी खुर्द येथे आणले. शायिस्ताने मात्र सासरी येण्यास नकार दिला होता. तरीही पतीने तिला जबरीने घरी आणले.
रात्री पती-पत्नीत पुन्हा वाद झाला. या वादातच पती अन्सार खान याने शायिस्ताच्या डोक्यात घातक शस्त्राने वार केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने ती जागीच गतप्राण झाली. त्यानंतर अन्सार खान याने रात्री २ वाजताच्या सुमारास सासऱ्यांना फोन करून तुमच्या मुलीला घेऊन जा असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय रत्नपारखी यांनी घटनास्थळ गाठून शायिस्ताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला. शहर पोलीस आरोपी अन्सार खान याचा शोध घेत आहे. मात्र खुनाचे कारण कळले नाही.

Web Title: Pregnant wife murdered by husband

टॅग्स :Murderखून