लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड होते. यात कापसाचे सर्वाधिक उत्पन्न मिळावे, म्हणून शेतकरी मान्सूनपूर्व कापसाची लागवड करतात. याचवेळी गुलाबी बोंडअळीचे कोशमात्र आक्रमण करण्याचा धोका असतो. गुलाबी बोंडअळीचे चक्र भेदण्यासाठी १ जूननंतरच कापसाचे बियाणे विक्री करण्याचे आदेश होते. मात्र, यावर्षी १५ मेपासून कापूस बियाणे विक्रीच्या सूचना आहेत. यासोबतच १ जूननंतर कापूस लागवड करण्याचे आदेश कृषी विभागाने काढले आहेत.
प्रत्यक्षात शेतकरी कृषी विभागाच्या सूचनांचे पालन कितपत करतील, हा खरा प्रश्न आहेत. या सूचनांचे पालन न झाल्यास गुलाबी बोंडअळीचा जिल्ह्यात उद्रेक होण्याची चिन्ह आहेत. यातून शेतकऱ्यांना पुन्हा नव्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.
जिल्ह्यात यावर्षी पाच लाख हेक्टरवर कापसाची लागवड होण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात कापसाच्या बियाण्याची उचल शेतकरी करणार आहेत. पेरणीच्या तोंडावर बाजारात बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होते. यामुळे शेतकरी पेरणी पूर्वीच बियाण्याची मोठ्या प्रमाणात उचल करणार आहेत. बियाणे खरेदी झाल्यामुळे पाऊस बरसताच शेतकरी पेरणीकरिता घाई करणार आहेत. अशा परिस्थितीत कापसाची लागवड मान्सूनपूर्व क्षेत्रावर होण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी केलेली लागवड कापसाचे उत्पादन घटीला कारणीभूत ठरण्याचा धोका आहे.
नियंत्रणासाठी १७ पथकेशेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कपाशिची लागवड होऊ नये, म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने १७ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. हे भरारी पथक शेतकऱ्यांच्या लागवडीवर नियंत्रण ठेवणार आहे. वेळेपूर्वी पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीच बोंडअळीच्या धोक्याचे पूर्व संकेत गुलाबा देणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे.
दोन हजार ४० गावांपुढे भरारी पथकही अपुरे पडणारदोन हजार ४० गावांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १७ भरारी पथके अपुरे असणार आहे. यामुळे अशा सर्व ठिकाणी वाँच ठेवण्यासाठी कृषी विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गावोगावी कॅम्प घ्यावे लागणार आहे.