पाऊस, समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना

By Admin | Updated: July 19, 2015 02:36 IST2015-07-19T02:36:09+5:302015-07-19T02:36:09+5:30

रमजान ईदच्या पर्वावर समाजबांधवांनी जिल्ह्यात मुबलक पाऊस, समृद्धी आणि शांती नांदावी म्हणून ठिकठिकाणी प्रार्थना केली.

Pray for rain, prosperity and peace | पाऊस, समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना

पाऊस, समृद्धी आणि शांतीसाठी प्रार्थना

ईद उत्साहात : सौहार्द वाढविण्यासाठी पोलिसांनी दिले गुलाबपुष्प
यवतमाळ : रमजान ईदच्या पर्वावर समाजबांधवांनी जिल्ह्यात मुबलक पाऊस, समृद्धी आणि शांती नांदावी म्हणून ठिकठिकाणी प्रार्थना केली. यावेळी सर्व समाजबांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर जातीय सलोखा कायम राहावा आणि सौहार्द वाढावा म्हणून पोलीस विभागाने मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
यवतमाळ शहरातील इदगाह मैदानावर जामा मशिदचे इमाम मौलाना याकूब यांनी ईदेचा नमाज अदा केला. यावेळी असंख्य समाजबांधव उपस्थित होते. यावेळी मौलानांनी रमजानचे महत्त्व समजावून सांगितले. दुसऱ्यांच्या सुख-दु:खात सामील होण्यासाठी पुढे येण्याचे आवाहनही केले. पाऊस, समृद्धी आणि शांतीची प्रार्थना करण्यात आली. या ठिकाणी समाजबांधवांनी एकमेकांना ईदेच्या शुभेच्छा दिल्या. स्थानिक कळंब चौकात सर्वच समाजबांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. इतकेच नव्हे तर, पोलीस अधीक्षक अखिलेश सिंग यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी राहुल मदने, ठाणेदार मुकुंद कुलकर्णी, बाळकृष्ण जाधव, दिलीप चव्हाण यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन ईदेच्या शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात सर्वत्र ईद उत्साहात साजरी झाली. (शहर वार्ताहर)

Web Title: Pray for rain, prosperity and peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.