‘प्रतिसाद’ने दिली त्यांच्या आयुष्याला नवी दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST2019-10-05T06:00:00+5:302019-10-05T06:00:13+5:30

हा उपक्रम राबविण्यापूर्वी संघटनेने पोलीस अधीक्षकांना रितसर अर्ज दिला होता. हा उपक्रम प्रत्यक्ष राबविण्यात आला. शहरातील १० ते १२ मनोरूग्णांचा शोध या फाउंडेशनने घेतला. स्थानिक तहसील चौकात मनोरूग्णांची कटींग करून त्यांना अंघोळ घालण्यात आली. त्यांना नवीन कपडे आणि चप्पल दिल्या.

The 'Pratisad' gave them a new direction in life | ‘प्रतिसाद’ने दिली त्यांच्या आयुष्याला नवी दिशा

‘प्रतिसाद’ने दिली त्यांच्या आयुष्याला नवी दिशा

ठळक मुद्देमनोरुग्णांना स्नान, कटींग व नवे कपडे : नवरात्रात घेतला नवा वसा, पोलिसात नोंद करून मेडिकलमध्ये उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : फाटके कपडे, दाढी वाढलेली त्यावर धुळीचा बसलेला थर, केसांचे पुंजके, मळलेले काळेकुट्ट कपडे, अंगावर घाणीचा थर या अवस्थेत भीक्षा मागणारे मनोरूग्ण आपल्याला दारोदार दिसतात. त्यांच्या हातावर दोन पैसे टाकून आपण मोकळे होतो. मात्र यवतमाळच्या प्रतिसाद फाउंडेशनने नवरात्र उत्सवात नवा वसा घेतला आहे. अशा भिक्षेकऱ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याचे काम हाती घेतले आहे.
हा उपक्रम राबविण्यापूर्वी संघटनेने पोलीस अधीक्षकांना रितसर अर्ज दिला होता. हा उपक्रम प्रत्यक्ष राबविण्यात आला. शहरातील १० ते १२ मनोरूग्णांचा शोध या फाउंडेशनने घेतला. स्थानिक तहसील चौकात मनोरूग्णांची कटींग करून त्यांना अंघोळ घालण्यात आली. त्यांना नवीन कपडे आणि चप्पल दिल्या.
या मनोरूग्णांची पोलीस ठाण्यात नोंद करून वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता नेले जाणार आहे. यानंतर त्यांना नागपूरच्या मनोरूग्णालयात हलविले जाणार आहे. स्थानिक पातळीवर दुरूस्त होणाºया रूग्णांवर यवतमाळातच उपचार होणार आहे. यामुळे त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळणार आहे.
या मनोरूग्णांना आणताना फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना प्रचंड कसरत करावी लागली. हे रूग्ण एका जागेवर थांबण्यासाठी तयार नव्हते. त्यांना अनेकांनी पकडून एका जागेवर आणले.
प्रतिसादचे अध्यक्ष मनोज गुल्हाणे, उपाध्यक्ष अर्पित शेरेकर, प्रसिद्धी प्रमुख संदीप शिंदे, सचिव सचिन ठाकरे, आरोग्य सेवक राजू मदनकर, कमलेश बघेल, विनोद दोंदल, ऋषिकेश दाभेराव, ऋषिकेश पवार, बाळू खरात, दिनेश अक्कावार, प्रवीण लाहोरे, अतुल तायडे, अनुज गजभिये, ऋषिकेश श्रृतीकार, प्रदीप शिंदे, भगवान भगत, सुरेश खरात ही मंडळी या कामाकरिता मेहनत घेत आहे. प्रतिसाद फाऊंडेशनतर्फे शहर आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. यासाठी नागरिकांचेही सहकार्य लाभत आहे. प्रतिसादची माहिती घेऊन कुठे अडचण निर्माण झाल्यास त्यांची मदत घेतली जाते.
मनोरूग्ण महिलांसाठी स्वतंत्र विंग
या मोहिमेत मनोरूग्ण महिलांना सावरण्यासाठी प्रतिसादची स्वतंत्र विंग स्थापन करण्यात आली आहे. या महिला मनोरुग्ण महिलांची सुश्रृषा करण्यासोबत त्यांना रूग्णालयापर्यंत पोहचविण्याचे काम करणार आहे.
विद्यार्थी, कर्मचारी आणि व्यावसायिक
या मोहिमेला दिशा देण्यासाठी विद्यार्थी, कर्मचारी आणि व्यावसायिकांनी पुढाकार घेतला. दैनंदिन कामकाज सांभाळत त्यांनी या उपक्रमाला मोलाचा हातभार लावला आहे.

Web Title: The 'Pratisad' gave them a new direction in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.