वीजवाहिनीच्या समांतर डिश केबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:02 IST2019-01-31T00:01:28+5:302019-01-31T00:02:35+5:30

वीज वाहिनीच्या समांतर टाकलेली डिश केबल धोकादायक ठरत आहे. दुसरीकडे या केबलमुळे शहराच्या वीज पुरवठ्यातही अडथळे निर्माण होत आहे. विद्युत कंपनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. तरीही दुर्लक्ष केले जाते.

Power cable parallel dish cable | वीजवाहिनीच्या समांतर डिश केबल

वीजवाहिनीच्या समांतर डिश केबल

ठळक मुद्देवीज कंपनीचे दुर्लक्ष : नेर शहराच्या वीज पुरवठ्यात अडथळे, अपघात होण्याची भीती

किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : वीज वाहिनीच्या समांतर टाकलेली डिश केबल धोकादायक ठरत आहे. दुसरीकडे या केबलमुळे शहराच्या वीज पुरवठ्यातही अडथळे निर्माण होत आहे. विद्युत कंपनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. तरीही दुर्लक्ष केले जाते.
केबल व्यावसायिकांकडून डिश केबल वायर टाकण्यासाठी सर्रास वीज खांबांचा वापर केला जात आहे. नेर येथे तर कळस गाठण्यात आला. दारव्हा ते नेर अशी केबल चक्क ३३ केव्ही वीज वाहिनीच्या समांतर टाकण्यात आली आहे. वीज तारांना ही केबल बांधली गेली आहे. केबलमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती करणाºया व्यक्तिच्या जीवाला मोठा धोका आहे. १५ दिवसांपूर्वी असा प्रकार याठिकाणी घडला. वीज वाहिनीच्या धक्क्याने युवक गंभीर जखमी झाला. यानंतरही केबल काढण्याची तसदी कुणी घेतली नाही.
केबल दुरुस्ती करताना वीज वाहिनीशी छेडछाड केली जाते. या प्रकारात वीज प्रवाहसुद्धा विस्कळीत होतो. ही बाब वीज कंपनी अधिकाऱ्यांना माहीत आहे. तरीही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नाराजी पाहायला मिळते. वरिष्ठांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी आहे. उच्चदाब वीज वाहिनीशी सुरू असलेला खेळ जीवघेणा ठरू पाहात असताना विद्युत कंपनी सुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Power cable parallel dish cable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज