'पाझिटिव्ह टू निगेटिव्ह'; 16 जणांना सुट्टी, एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 18:52 IST2020-06-28T18:52:29+5:302020-06-28T18:52:35+5:30

'पाझिटिव्ह टू निगेटिव्ह'; 16 जणांना सुट्टी, एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु

'Positive to negative'; 16 people discharged, one corona patient dies in yavtmal | 'पाझिटिव्ह टू निगेटिव्ह'; 16 जणांना सुट्टी, एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु

'पाझिटिव्ह टू निगेटिव्ह'; 16 जणांना सुट्टी, एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी एका जणाचा मृत्यु झाला आहे. तर एक जण नव्याने पॉझेटिव्ह आला आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 16 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

रविवारी मृत्यु झालेला व्यक्ती (वय 75) हा नेर तालुक्यातील पाथ्रडगोळे येथील आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची संख्या नऊ झाली आहे. तसेच आज यवतमाळ तालुक्यातील लाडखेड येथील एक पुरुष नव्याने पॉझेटिव्ह आला आहे. शनिवारी जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 67 होता. एक मृत्यु व एक नव्याने पॉझेटिव्ह आल्याने ही संख्या 67 वर स्थिरावली. मात्र रविवारी 16 जणांना रुग्णालयातून सुट्टी झाल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 51 वर आली आहे.  

गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 115 रिपोर्ट प्राप्त झाले. यात एक जण पॉझेटिव्ह तर 114 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 68 जण भरती आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 267 झाली आहे. यापैकी तब्बल 207 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात नऊ जणांच्या मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी 97 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 4666 नमुने तपासणीकरीता पाठवले असून यापैकी 4507 प्राप्त तर 159 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4240 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

Web Title: 'Positive to negative'; 16 people discharged, one corona patient dies in yavtmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.