ढाणकीतील तळे भरले तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:34 AM2021-07-25T04:34:46+5:302021-07-25T04:34:46+5:30

पाणीपातळी वाढण्यास झाली मोलाची मदत फोटो ढाणकी : गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन २०१८ मध्ये ढाणकी ते टेंभेश्वरनगर मार्गावर ...

The pond in Dhanki is full of water | ढाणकीतील तळे भरले तुडुंब

ढाणकीतील तळे भरले तुडुंब

Next

पाणीपातळी वाढण्यास झाली मोलाची मदत

फोटो

ढाणकी : गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन २०१८ मध्ये ढाणकी ते टेंभेश्वरनगर मार्गावर दूध शीतकरण गृहामागे तळे तयार केले होते. आता हे तळे पाण्याने तुडुंब भरले आहे.

दरवर्षी पावसाचे पाणी वाहून जाते. सिमेंटच्या युगात पाणी मुरविण्यासाठी जागाच शिल्लक नाही. पाणी जमिनीत मुरत नसल्याने पाणी पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. त्याचा फटका ढाणकीकरांना बसत आहे. सध्या मात्र ढाणकीतील परिस्थिती वेगळी आहे. या तळ्यामुळे पाणीपातळी बरीचशी वाढली आहे. पाणीटंचाईच्या झळा काही प्रमाणात कमी झाल्या आहेत.

पावसाचे पाणी वाया न जाता आता या तळ्यात साचून राहते. ते जमिनीत मुरते. उन्हाळा येईपर्यंत तळ्यात पाणी राहते. त्यामुळे थेंब न्‌ थेंब जमिनीत मुरतो. उंचावरील पाणी थेट या तळ्यात जमा होते. त्यामुळे गावात येणाऱ्या पाण्याच्या मोठ्या लोंढ्याला आळा बसला आहे. आता पाणी जमिनीत मुरत असून, ढाणकी व परिसरातील विहिरी, बोअरवेल, हातपंप यांची पाणीपातळी वाढत आहे.

विशेष म्हणजे तळे खोदताना जो मुरूम निघाला, तो अत्यल्प किमतीमध्ये विकण्यात आला. त्यामुळे परिसरातील पांदण रस्त्यांचा प्रश्नसुद्धा मिटला. हे तळे ढाणकीकरांसाठी संजीवनी ठरले आहे.

240721\img_20210724_083746.jpg

ढाणकीतील तळे पाण्याने भरले तुडुंब.

पाणी पातळी वाढण्यास झाली मोलाची मदत.

Web Title: The pond in Dhanki is full of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.