लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळ : कारागृहातील आरोपी पुसद येथे सोडून परत येत असलेल्या यवतमाळ पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या व्हॅनला नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मंगरूळ (ता.आर्णी) गावानजीक रात्री १ वाजता आयशर ट्रकने (क्र.एमएच-१३-सीयू-६५९८) जबर धडक दिली. या अपघातात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले.जखमी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चालक सुनील केसगीर, जमादार मुश्ताक पठाण, शिपाई हरीश भावेकर हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध घेतला जात आहे. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी कर्मचाºयांची विचारपूस केली.
पोलीस व्हॅनला अपघात, तीन कर्मचारी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST