नागरिकांच्या मदतीसाठी पोलिसांचा ‘प्रतिसाद अ‍ॅप’

By Admin | Updated: March 29, 2016 03:33 IST2016-03-29T03:33:48+5:302016-03-29T03:33:48+5:30

संकटात अडकलेल्या व्यक्तीला तत्काळ मदत मागता यावी, यासाठी जिल्हा पोेलीस दलाने अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलसाठी

Police 'response app' to help citizens | नागरिकांच्या मदतीसाठी पोलिसांचा ‘प्रतिसाद अ‍ॅप’

नागरिकांच्या मदतीसाठी पोलिसांचा ‘प्रतिसाद अ‍ॅप’

यवतमाळ : संकटात अडकलेल्या व्यक्तीला तत्काळ मदत मागता यावी, यासाठी जिल्हा पोेलीस दलाने अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलसाठी ‘प्रतिसाद अ‍ॅप’ अ‍ॅक्टीवेट केला आहे. यावरून संकटाची चाहूल लागताच परिसरातील पोलिसांकडून काही मिनिटातच मदत मागविता येणार आहे. एका क्लिकवर पोलीस धावून येतील, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी पत्रपरिषदेत दिली.
पोलीस महासंचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. महिला, मुुली यांच्या सुरक्षेसाठी हा अ‍ॅप आहे. अ‍ॅन्ड्रॉईड फोन वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला याचा उपयोग करता येणार आहे. गुगल प्ले स्टोअरमधून ‘प्रतिसाद (एएसके)’ अ‍ॅप डाऊनलोड करता येईल. त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि कॅपाची कोड टाकून रजिस्टर होता येते. या अ‍ॅपवर संकटकाळी मदत मागविण्यासाठी जवळच्या तीन नातेवाईकांचा मोबाईल क्रमांकही लिंकअप करता येते. पोलिसांसोबतच या नातेवाईकांनाही तुम्ही संकटात असल्याची सूचना काही क्षणात मिळणार आहे. अतिशय कमी केबी असलेल्या इंटरनेटवरही अ‍ॅप सहज वापरता येते. तुम्ही संकटात असताना प्रतिसाद आस्कवर टच करताच तीन किलोमीटर परिसरातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्याला सूचना जाणार आहे. या परिक्षेत्रात कुणी नसल्यास दहा किलोमीटर परिसरात असलेल्या अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर सूचना जाणार आहे. जीपीएस सिस्टीममुळे तुम्ही नेमके कोणत्या ठिकाणावर आहे, याची माहिती पोलिसांकडे जाणार आहे. सध्या जीपीएस अप्लिकेशन असलेल्या २२९ पोलीस अधिकारी-कर्मचारी जिल्ह्यात आहे. वैशिष्ट्य म्हणजे राज्यभर अ‍ॅप काम करणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय देशमुख, उपनिरीक्षक सुगत पुंडगे, रचना नरांजे उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Police 'response app' to help citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.