पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

By Admin | Updated: January 4, 2016 04:37 IST2016-01-04T04:37:03+5:302016-01-04T04:37:03+5:30

पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ शुक्रवारी येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात घेण्यात

Police personnel felicitation | पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार

यवतमाळ : पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ शुक्रवारी येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग उपस्थित होते. या कार्यक्रमात पोलीस नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस उपनिरीक्षक मो. शफी मो. हमीद यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. शफी यांच्या कार्याचा गौरव यावेळी पोलीस अधीक्षकांनी केला.
गेली ३४ वर्षे पोलीस दलात कार्यरत मो. शफी यांच्या अनुभवाचा फायदा पोलिसांना व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार, पोलीस उपअधीक्षक (गृह) डोंगरदिवे, नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक संजय शिरभाते यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक आणि विविध विभागातील पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Police personnel felicitation