शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 5:00 AM

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय इच्छेने व्हाव्या यासाठी प्रयत्न आहेत. सत्ताधारी नेत्याने जिल्ह्यातील अशा १६ पोलीस अधिकाऱ्यांची यादी तयार करून पोलीस प्रशासनाला फेरबदलासाठी पाठविल्याचे सांगितले जाते. बहुतांश ठाण्यात फेरबदल व्हावे व ते आपल्या भेटीगाठीसाठी यावे, हाच यामागील छुपा उद्देश आहे. त्या १६ अधिकाऱ्यांमध्ये वणी, पांढरकवडा, नेर, दिग्रस, दारव्हा, पुसद यासारख्या मोठ्या ठाण्यांचाही समावेश आहे.

ठळक मुद्देतीन निरीक्षक जाणार परिक्षेत्राबाहेर : सहा ‘एपीआय’चाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना यावर्षीच्या सार्वत्रिक बदल्यांचे वेध लागले आहेत. काही अधिकारी परिक्षेत्राबाहेर, तर काही जिल्ह्याबाहेर जाणार आहेत.३१ जुलैपूर्वी यावर्षीच्या बदल्या जाणार आहेत. राज्यस्तरीय बदल्यांमध्ये परिक्षेत्राबाहेर नियुक्त्या होतील, नंतर परिक्षेत्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात नियुक्त्या केल्या जातील. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या होणार आहेत.यवतमाळ जिल्ह्यातून कळंबचे ठाणेदार विजय राठोड, बाभूळगावचे ठाणेदार सतीश जाधव, यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार संजय शिरभाते सहा वर्षांची सलग सेवा झाल्याने परिक्षेत्राबाहेर जाणार आहेत. तर मुकुंद कुलकर्णी, संजय डहाके हे पोलीस निरिक्षक जिल्ह्याबाहेर जाणार आहेत. परिक्षेत्राबाहेर जावू शकणाऱ्या सहायक पोलीस निरिक्षकांमध्ये मनोज लांडगे, पाचकवडे, प्रशांत गिते, झळके, अनिता गायकवाड, अनिल राऊत या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. सध्या जिल्ह्यातच राहणाºया पोलीस अधिकाऱ्यांनी सोयीच्या ठिकाणी नियुक्त्या मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यात महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांनी वडकी, पारवा, लाडखेड, वडगाव(जं) या आपल्या क्षमतेच्या ठाण्यांवर लक्ष केंद्रीत केले. लाडखेड, वडगाव या ठाण्यांची नियुक्ती माझ्या कन्सेंटशिवाय नाही, असा संदेश राजकीय स्तरावरून प्रशासनाकडे पोहोचला आहे. जिल्ह्याच्या अन्य भागातही इच्छुकांनी राजकीय मार्गाने महत्त्वाचे ठाणे मिळविण्यासाठी आतापासूनच प्रयत्न चालविले आहे.राजकीय मार्गाने १६ अधिकाऱ्यांची यादीजिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय इच्छेने व्हाव्या यासाठी प्रयत्न आहेत. सत्ताधारी नेत्याने जिल्ह्यातील अशा १६ पोलीस अधिकाऱ्यांची यादी तयार करून पोलीस प्रशासनाला फेरबदलासाठी पाठविल्याचे सांगितले जाते. बहुतांश ठाण्यात फेरबदल व्हावे व ते आपल्या भेटीगाठीसाठी यावे, हाच यामागील छुपा उद्देश आहे. त्या १६ अधिकाऱ्यांमध्ये वणी, पांढरकवडा, नेर, दिग्रस, दारव्हा, पुसद यासारख्या मोठ्या ठाण्यांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारीही सोयीने बदलविता येतात काय, यादृष्टीने चाचपणी केली जात आहे. पांढरकवडा एसडीपीओ अमोल कोळी यांची बदली निश्चित मानली जात आहे.एम. राज कुमार ६३ वर्षांत सर्वाधिक काळ एसपी१९५७ पासून तर आतापर्यंत गेल्या ६३ वर्षांत सर्वाधिक काळ यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक राहिलेले विद्यमान एसपी एम. राज कुमार हे एकमेव आहेत. ६ जानेवारी २०१७ ला एम. राज कुमार यांनी यवतमाळच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांचा तीन वर्षे सात महिन्यांचा अर्थात ४३ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होतो आहे. यापूर्वी अंकुश धनविजय हे तीन वर्ष पाच महिने येथे एसपी राहिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४२ एसपी होवून गेले. त्यापैकी एस.एस. विर्क हे एकमेव राज्याच्या पोलीस महासंचालक पदापर्यंत जाऊ शकले. इतर काहींनी अपर महासंचालक, महानिरीक्षकांपर्यंत मजल मारली. यापूर्वी अमितेशकुमार येथून सोलापूर ग्रामीणला गेले होते. आता एम. राज कुमार त्याच पॅटर्ननुसार नाशिक ग्रामीणला जातात का, याकडे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेचे लक्ष लागले आहे.‘आयपीएस’ला यादीची प्रतीक्षा, भुजबळांचा जोरआयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांकडे सर्वांच्या नजरा आहेत. या आठवड्याच्या अखेरीसपर्यंत आयपीएसच्या बदल्यांची यादी जारी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एसपी होण्यासाठी चौघांची नावे चर्चेत असली तरी त्यात बुलडाणा एसपी दिलीप भुजबळ पाटील यांचा जोर सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते. भुजबळ यांची मुंबईतील ‘बुलेट प्रुफ जॅकेट खरेदी’ प्रकरणातील चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या ‘डीआयजी’ पदावरील बढतीसही विलंब होत असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली