शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

संघटितपणे मालमत्ता बळकावणाऱ्या विरोधात पोलीस प्रशासन आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 05:00 IST

भूखंड बळकावल्याच्या चार प्रकरणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याव्यतिरिक्त ज्या सामान्य नागरिकांना संघटित गुन्हेगारांच्या टोळीने धाक दाखवून जमीन, प्लाॅट बळकावले, अनधिकृतपणे भूखंडावर ताबे मिळवले, संबंधितांना धमकावण्यासाठी अग्नीशस्त्राचा वापर केला, अशा घटनेतील पीडितांनी निर्भयपणे पोलिसांकडे प्रकरण द्यावे, यासाठी एसआयटीची (विशेष समिती) स्थापना केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरासह जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी टोळीने धाक दडपशाही करून अग्नीशस्त्रांचा वापर करून भूखंड बळकावल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. बोगस कागदपत्रांचा वापर केल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे अशा भूखंड माफियांच्या संघटित टोळीचा बीमोड करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, पोलीस प्रशासन पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी गुरुवारी रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. भूखंड बळकावल्याच्या चार प्रकरणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याव्यतिरिक्त ज्या सामान्य नागरिकांना संघटित गुन्हेगारांच्या टोळीने धाक दाखवून जमीन, प्लाॅट बळकावले, अनधिकृतपणे भूखंडावर ताबे मिळवले, संबंधितांना धमकावण्यासाठी अग्नीशस्त्राचा वापर केला, अशा घटनेतील पीडितांनी निर्भयपणे पोलिसांकडे प्रकरण द्यावे, यासाठी एसआयटीची (विशेष समिती) स्थापना केली आहे. एसआयटीकडून प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी केली जाईल. याकरिता नोंदणी कार्यालय, नगर परिषद, ग्रामपंचायत, महसूल विभाग यासह संबंधित सर्व कार्यालयांची मदत घेण्यात येईल. खोटे दस्तऐवज तयार केल्याचे आढळल्यास ते रद्द करण्यासाठीही एसआयटीकडून मदत करण्यात येईल. बोगस फेरफार रद्द करण्याकरिता दिवाणी दावे दाखल करण्यासाठी एसआयटीकडून कायदेशीर मदतही केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी अशाप्रकारचा अन्याय सहन न करता निर्भयपणे तक्रारी कराव्यात, त्यांचा सखोल तपास करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी सांगितले. संघटितपणे गुन्हेगारी टोळी स्थापन करून सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्ता बळकावणाऱ्यांविरोधात पोलीस निडरपणे कारवाई करत आहेत. कायदेशीर बाबींची पडताळणी करून तटस्थपणे वास्तवाचा शोध घेऊन दोषींना शासन होईल, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची ग्वाही पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिली. 

टोळीच्या म्होरक्याला अटक करणाऱ्यांना बक्षीस    - संघटित गुन्हेगारी करणारा कुख्यात गुंड आनंद उर्फ बंटी द्वारकाप्रसाद जयस्वाल, त्याचा साथीदार गोपाल दीपकचंद बख्तीयार या दोघांना आंध्र प्रदेशातील तिरुपती येथून अटक करणाऱ्या पोलीस पथकाला एसपींनी ५० हजारांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. ही अटकेची कारवाई सायबर सेलचे प्रभारी अमोल पुरी, एलसीबीचे गजानन कऱ्हेवाड, जमादार गजानन डोंगरे, विशाल भगत, कविश पाळेकर, उल्हास कुरकुटे, मोहंमद भगतवाले, पंकज गिरी, प्रवीण कुठे व पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी पार पाडली आहे. 

एसआयटीची स्थापना  - भूमाफियांविरोधातील कारवाईसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डाॅ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ शहर ठाणेदार व अवधूतवाडी ठाणेदार, भरोसा सेल प्रमुख यांचा एसआयटीमध्ये समावेश आहे. यापुढे ही एसआयटी स्वतंत्रपणे काम करणार आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस