विषारी गवतामुळे ११ जनावरे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:20+5:30
चिचबर्डी हे यवतमाळ लगत असल्याने येथे बहुतांश शेतकऱ्यांचा दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे. प्रत्येकाकडे म्हशी, गाई आहे. ओमराज चव्हाण या शेतकऱ्याकडेही दुधाच्या म्हशी व गाई होत्या. आता कपाशीचे पीक शेवटच्या टप्प्यात असल्याने त्यात घरची जनावरे चरण्यासाठी सोडली. २१ जानेवारीपासून काही जनावरांमध्ये शरीरिक त्रास दिसू लागला.

विषारी गवतामुळे ११ जनावरे ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : घरच्या शेतात नेहमी चरायला जाणाऱ्या जनावरांचा एका पाठोपाठ एक असा मृत्यू झाला. काही समजायच्या आत तब्बल ११ जनावरे ठार झाली. ही घटना नेर मार्गावरील चिचबर्डी येथे घडली. विषाक्त गवत खालल्यामुळे जनावरे दगावल्याचे पशुवैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
चिचबर्डी हे यवतमाळ लगत असल्याने येथे बहुतांश शेतकऱ्यांचा दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे. प्रत्येकाकडे म्हशी, गाई आहे. ओमराज चव्हाण या शेतकऱ्याकडेही दुधाच्या म्हशी व गाई होत्या. आता कपाशीचे पीक शेवटच्या टप्प्यात असल्याने त्यात घरची जनावरे चरण्यासाठी सोडली. २१ जानेवारीपासून काही जनावरांमध्ये शरीरिक त्रास दिसू लागला. स्थानिक पशुवैद्यकीय यांना जनावरे दाखविली. मात्र पायझनिंगचा प्रकार आहे एवढेच सांगण्यात आले. एका पाठोपाठ एक अशी जनावरे दगावण्यास सुरुवात झाली. दुधाच्या चार म्हशी ठार झाल्या. पाच वगारी, एक हल्या व एका कालवडीचा सुद्धा यात समावेश आहे. आठ दिवसात चार लाखांचे पशुधन नष्ट झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळली. शिवाय गावातील इतर पशुपालकांमध्येही दहशत निर्माण झाली.
नेमकी जनावरे कशामुळे दगावतात याचा शोध घेतला असता विषाचा अंश असलेले गवत शेतामध्ये आढळून आले. या गवताला बोली भाषेत छोटा मीरा, ढोर काकडा असे संबोधतात. गर्द हिरव्या रंगाचे हे गवत जनावरांना आकृष्ट करते. या गवताला जांभळ्या रंगाची फुलं येतात. गवतात विषाचा अंश असल्याने जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास जनावरे दगावतात. ओमराज चव्हाण यांच्या कपाशीच्या शेतात ओलितामुळे मोठ्या प्रमाणात छोटा मीरा हे गवत उगवल्याचे दिसून येते. चिचबर्डी येथील इतरही शेतकऱ्यांच्या शेतात हे गावत उगवले आहे. मात्र वेळीच सावध होवून जनावरांना छोटा मीरा गवत असलेल्या शेतात सोडणे बंद केले.
अशी आहेत लक्षणे
छोटा मीरा, ढोर काकडा हे गवत खाण्यात आल्यास जनावर रवंथ करण थांबवितात. त्यानंतर लाळ गाळते. जनावराच्या शारीराला कंप सुटतो. ते थरथर कापते. जनावराची शौच व लघवी बंद होते. पोट फुगून जनावराचा मृत्यू होतो. बºयाचदा जनावराची मानही वाकडी होते. ही या गवतामुळे झालेल्या विषबाधेची लक्षणे आहे.
बोली भाषेत छोटा मीरा संबोधल्या जाणाºया गवतामध्ये अॅक्झालिक पॉयझन असते. या गवताचे सेवन केल्यानंतर जनावरांना विषबाधा होते. चिचबर्डी येथील जनावरांचे नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत पाठविले आहे. लक्षणावरून जनावरांचा अॅक्झालिक पॉयझनिंगमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे.
- डॉ.भावना झाडे
पशुधन विकास अधिकारी
फिरता दवाखाना