शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रात शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: September 21, 2014 23:58 IST

पिकांवर सध्या विविध किडींनी आक्रमण केले असून, कीड नियंत्रणात आणताना शेतकरी मेटाकुटीस आले असतानाच आता उमरखेड तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची

उमरखेड (कुपटी) : पिकांवर सध्या विविध किडींनी आक्रमण केले असून, कीड नियंत्रणात आणताना शेतकरी मेटाकुटीस आले असतानाच आता उमरखेड तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. खत आणि कीटकनाशकांची कृत्रिम टंचाई निर्माण करून ज्यादा दराने विक्री केली जात आहे. हा प्रकार कृषी विभागातील अधिकाऱ्यांना माहीत असला तरी कारवाई मात्र केली जात नाही. उमरखेड तालुक्यात यावर्षी शेतकरी हतबल दिसत आहे. सुरूवातीला पावसाची दडी. त्यानंतर दुबार, तिबार पेरणीचे संकट़ पोळ््यापासून पावसाला सुरूवात झाली. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र किडींनी आक्रमण केले. कीड नियंत्रणासाठी किटकनाशक आणि पिकांच्या वाढीसाठी खतांची आवश्यकता आहे. परंतु नेमकी हिच वेळ साधून कृषी केंद्र चालकांनी पिळवणूक सुरू केली आहे. तालुक्यातील उमरखेड, ढाणकी, विडूळ, चातारी, ब्राह्मणगाव, बिटरगाव, पोफाळी, मुळावा, निंगणूर, जेवली, भवानी, दराटी आदी गावांमध्ये कृषी साहित्याची ज्यादा दराने विक्री केली जात आहे. तालुक्यात कृषी हंगामाच्यावेळी युरिया मुबलक होता. मात्र सुरूवातीपासून पावसाने दडी मारल्याने युरियाची मागणी नव्हती. आता पाऊस चांगला झाल्याने आता युरियाची मागणी वाढली आहे. मात्र आता कृषी केंद्र चालक युरियाची कृत्रिम टंचाई करीत आहे. ज्यदा दर दिल्यास युरिया तात्काळ उपलब्ध करून दिल्या जातो. अनेक कृषी केंद्र चालकांनी आपल्या गोदामात युरियाची साठवण करून ठेवली आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी वाटेल ती किंमत मोजायला तयार असतो. यासोबतच औषधीची ही अशिच अवस्था आहे. (वर्ताहर)