शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

यवतमाळ शहरातील कुठल्याही भागात जा, आपल्याला रस्ते खोदलेले दिसतात. खोदलेले रस्ते थातूरमातूर काम करून बुजविले जातात. आता त्या ठिकाणी खड्डे पडत आहे. तर शहरातील अंतर्गत वसाहतीमध्ये हे खड्डेही अनेक ठिकाणी उघडे ठेवले आहे. तर काही भागात संपूर्ण रस्त्यावर माती पसरलेली आहे. काही ठिकाणी हापसीही या मातीच्या ढिगाºयात निकामी करण्याचा प्रयत्न झाला आहे.

ठळक मुद्देबुजवणार कोण ? : नागरिकांच्या तक्रारींचीही दखल नाही, अपघात वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहरात अमृत योजनेचे कामकाज गत अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे या कामाची डेडलाईनही संपली आहे. मात्र खोदकाम केल्यानंतर ते अर्धवट सोडून द्यायचे आणि दुसऱ्या भागात काम करायचे, असा प्रकार सुरू आहे. उघड्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. आता पावसाळ्यातही तक्रारींची दखल न घेतल्याने यवतमाळकरांनी स्वत:च टिकास पावडे हातात घेऊन नाल्या बुजविणे सुरू केले आहे.यवतमाळ शहरातील कुठल्याही भागात जा, आपल्याला रस्ते खोदलेले दिसतात. खोदलेले रस्ते थातूरमातूर काम करून बुजविले जातात. आता त्या ठिकाणी खड्डे पडत आहे. तर शहरातील अंतर्गत वसाहतीमध्ये हे खड्डेही अनेक ठिकाणी उघडे ठेवले आहे. तर काही भागात संपूर्ण रस्त्यावर माती पसरलेली आहे. काही ठिकाणी हापसीही या मातीच्या ढिगाºयात निकामी करण्याचा प्रयत्न झाला आहे.आता या भागात दैयनीय अवस्था आहे. पाईपलाईन झाली पण अजूनही पाणी नाही. खड्डे तसेच आहेत. यामुळे अपघात होत आहेत. प्राधिकरण आणि नगरपरिषदेला सांगितल्यावरही उपाययोजना झाल्या नाही. यामुळे काही भागात नागरिकांनी स्वत:च टिकास पावडे घेत खड्डे बुजविणे सुरू केले आहे.बोरेलेनगर : नवीन रस्ता झाल्यावरच कामबोरेलेनगरातील काही नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या. हितेंद्र पांडे म्हणाले, दोन महिन्यांपासून साई सहवास नगरातील खड्डे बुजवायचे आहेत. या भागात रोज अपघात होतात. पवन येलमुळे म्हणाले, पहिले केबलधारकांनी रस्ते खोदले, आता प्राधिकरणाने रस्ते खोदून ठेवले. कालीकाप्रसाद मूर्ती यांनी प्राधिकरण व पालिकेच्या कामावर नाराजी नोंदविली.अमृत योजनेत पाईपलाईन टाकण्यासोबत खोदलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी प्राधिकरणाची आहे. नाली बुजविताना माती दबते. यामुळे दोन चार दिवस वाट पाहून नंतर ती बुजविली जाते.- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरणअमृत योजनेतील पाईपलाईनचे काम आमच्याकडे नाही. ही जबाबदारी जीवन प्राधिकरणाची आहे. तेच खोदलेला रस्ता बुजविणार आहेत.- विनय देशमुख, अभियंता, नगरपालिका यवतमाळ