वाघाडी पॅटर्न राज्यासाठी पथदर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 22:22 IST2018-08-16T22:20:46+5:302018-08-16T22:22:27+5:30
जलद विकासाचा कार्यक्रम राज्य शासनाने नुकताच जाहीर केला. या अंतर्गत राज्यात नदी पुनरुज्जीवनाचा पहिला मान वाघाडी नदीच्या स्वरुपात यवतमाळ जिल्ह्याला मिळाल्यामुळे हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरणार, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला.

वाघाडी पॅटर्न राज्यासाठी पथदर्शक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जलद विकासाचा कार्यक्रम राज्य शासनाने नुकताच जाहीर केला. या अंतर्गत राज्यात नदी पुनरुज्जीवनाचा पहिला मान वाघाडी नदीच्या स्वरुपात यवतमाळ जिल्ह्याला मिळाल्यामुळे हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरणार, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी.पाटील, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणारे अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यासह उत्कृष्ट कार्य करणारे राज्य परिवहन महामंडळाचे वाहक गिता श्रीवास, रुख्मा मानवटकर, विठ्ठल माटे, चालक राजेंद्र मांडवे, अविनाश आंबेकर, तसेच स्वच्छ भारत मिशनचा पुरस्कार करणारे शिवचरण साहू, लघु उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे उज्वला आयुवेर्दाश्रमचे चंद्रकांत उके, जगदंबा कॉटन पार्कचे पवन बजाज, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत प्राविण्य मिळविणारा पुसद येथील पियुष डांगे, पहिल्या श्रेणीत दहावी उत्तीर्ण झालेली बहुरुपी समाजातील विद्याथीर्नी जया शिंदे, शिक्षिका शुभांगी आवारी यांचा स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन चंद्रबोधी घायवटे, डॉ. ललिता जतकर यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय, वरीष्ठ अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.