पोलिस पाटलांना किमान ४० हजार रुपये मानधन द्या; आठ हजार पदे रिक्त; तीन गावांची एकावर जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 10:17 IST2025-12-09T10:16:49+5:302025-12-09T10:17:29+5:30
शिवाय वारंवार होणाऱ्या बैठकांसाठी लागणारा पेट्रोलचा खर्च, वही, कागद या वस्तू वेळेवर पुरविल्या जात नाहीत. महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेने पोलिस पाटलांचे गाऱ्हाणे थेट गृहमंत्र्यांच्या दरबारी मांडले आहे. चर्चेप्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष महादेव नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष रवींद्र डोहीफोडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिस पाटलांना किमान ४० हजार रुपये मानधन द्या; आठ हजार पदे रिक्त; तीन गावांची एकावर जबाबदारी
यवतमाळ : संपूर्ण राज्यभरात पोलिस पाटलांची ४० हजार पदे आहेत. यापैकी ८ हजार पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांचा पदभार कार्यरत पोलिस पाटलांवर सोपविण्यात आला आहे. यामुळे एका पोलिस पाटलाला दोन ते तीन गावांची जबाबदारी आली आहे. असे असले तरी पोलिस पाटलांना निर्धारित मानधन वेळेवर मिळत नाही. शिवाय वारंवार होणाऱ्या बैठकांसाठी लागणारा पेट्रोलचा खर्च, वही, कागद या वस्तू वेळेवर पुरविल्या जात नाहीत. शिवाय वारंवार होणाऱ्या बैठकांसाठी लागणारा पेट्रोलचा खर्च, वही, कागद या वस्तू वेळेवर पुरविल्या जात नाहीत. महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेने पोलिस पाटलांचे गाऱ्हाणे थेट गृहमंत्र्यांच्या दरबारी मांडले आहे. चर्चेप्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष महादेव नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष रवींद्र डोहीफोडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वयोमर्यादा ६५ वर्षे करा
पोलिस पाटलांना किमान ४० हजार रुपये मानधन द्या. सेवानिवृत्तीचे वय ६५ करा, नवीन भरती झालेले पोलिस पाटील उच्चशिक्षित असल्याने त्यांना कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, पोलिस पाटलांना १० हजार रुपये रिटायरमेंट लागू करावी, सेवानिवृत्तीनंतर पात्र पाल्यांना घेण्यात यावे, रिक्त पदे भरावी, आदी प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.