यवतमाळच्या पोलीस अधीक्षकपदी पवन बनसोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 23:20 IST2022-10-21T23:20:12+5:302022-10-21T23:20:24+5:30
भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) राज्यातील तीन अधिकाऱ्यांच्या सुधारित पदस्थापनेचे आदेश गृह विभागाने शुक्रवारी रात्री जारी केले.

यवतमाळच्या पोलीस अधीक्षकपदी पवन बनसोड
यवतमाळ :
भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) राज्यातील तीन अधिकाऱ्यांच्या सुधारित पदस्थापनेचे आदेश गृह विभागाने शुक्रवारी रात्री जारी केले. त्यानुसार आता पवन बनसोड यांची यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी बनसोड यांची सिंधुदुर्ग अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.
गुरुवारी महाराष्ट्र पोलीस अकादमीचे अधीक्षक गौरव सिंह यांची यवतमाळच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्तीचे आदेश निघाले होते. मात्र, शुक्रवारी दुपारी अपर पोलीस महासंचालकांनी तातडीचे आदेश जारी करीत पुढील आदेशापर्यंत डॉ. दिलीप पाटील भुजबळ हेच यवतमाळचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळतील असे स्पष्ट केले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा सुधारित पदस्थापनेचे आदेश जारी करण्यात आले. त्यानुसार पवन बनसोड हे आता यवतमाळचे नवे पोलीस अधीक्षक असणार आहे.