चाकोरीचे खरडून कागद... :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 21:59 IST2017-08-08T21:57:24+5:302017-08-08T21:59:00+5:30

चाकोरीचे खरडून कागद... :
ठळक मुद्देआताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो... चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो...
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो... चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो... संदीप खरेंच्या या ओळी निराधाराचे अनुदान घेण्यासाठी जिल्हा बँकेच्या दारात आलेल्या वृद्धांचे दु:ख गडद करून जातात. बँकेची विड्रॉल स्लिपही भरता येत नसल्याने मंगळवारी वृद्ध महिलांची अडचण झाली. तेव्हा एका वृद्धानेच पुढे होऊन त्यांच्या स्लिप कशाबशा भरून दिल्या.