यवतमाळातील प्रेरणास्थळावर जवाहरलाल दर्डा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 10:17 IST2019-11-25T10:17:12+5:302019-11-25T10:17:53+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २२ व्या स्मृती समारोहानिमित्त सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी प्रेरणास्थळ येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

A passionate tribute to Jawaharlal Darda at the Yavatmal | यवतमाळातील प्रेरणास्थळावर जवाहरलाल दर्डा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

यवतमाळातील प्रेरणास्थळावर जवाहरलाल दर्डा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

ठळक मुद्देमान्यवरांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २२ व्या स्मृती समारोहानिमित्त सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी प्रेरणास्थळ येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, लोकमत एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, लोकमत-समाचार-टाईम्स सखी मंचच्या राज्य प्रमुख आशू राजेंद्र दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, लोकमतचे सहव्यवस्थापकीय संपादक ऋषी दर्डा, लोकमतचे संचालक करण दर्डा, लोकमत सखी मंच यवतमाळ जिल्हा प्रमुख सीमा दर्डा, सुनित कोठारी, पूर्वा कोठारी, रचना दर्डा, शीतल दर्डा, जयश्री भल्ला यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे, माजी आमदार कीर्ती गांधी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यासह अनेक मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Web Title: A passionate tribute to Jawaharlal Darda at the Yavatmal