बसस्थानकावर होते प्रवाशांची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:40+5:30
शहरातील जुन्या बसस्थानकाचे बांधकाम सुरू आहे. तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या नवीन बसस्थानकात कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. बसस्थानक परिसरात संडास व मूत्रीघराचे पाणी पसरलेले आहे. त्यामुळे येथे कायम दुर्गंधी पसरलेली असते. प्रवासी हा एसटी महामंडळाचा ग्राहक आहे. या नात्याने त्याला मुलभूत सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र प्रवाशांना अगदीच यातना भोगाव्या लागत आहे.

बसस्थानकावर होते प्रवाशांची परवड
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील जुन्या बसस्थानकाचे बांधकाम सुरू आहे. तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या नवीन बसस्थानकात कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. बसस्थानक परिसरात संडास व मूत्रीघराचे पाणी पसरलेले आहे. त्यामुळे येथे कायम दुर्गंधी पसरलेली असते. प्रवासी हा एसटी महामंडळाचा ग्राहक आहे. या नात्याने त्याला मुलभूत सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र प्रवाशांना अगदीच यातना भोगाव्या लागत आहे.
नव्या बसस्थानकामध्ये कुठलीही सोयीसुविधा नाही. या बसस्थानकावर खासगी प्रवासी वाहतूक करणारे थेट आतमध्ये येऊन प्रवासी घेऊन जातात. एकही एसटी बस वेळेवर सुटत नाही. ऐनवेळी रद्द झालेल्या गाड्यांची माहिती प्रवाशांना दिली जात नाही. या परिसरात मुरूम पसरविण्यात आला आहे. यात मोठे दगड असल्याने ते उसळून अनेक प्रवाशांची डोकी फुटली आहेत. इतक्या समस्या असूनही एसटीकडून कुठलीही उपाययोजना केली जात नाही. या गंभीर प्रकरणात प्रहार ग्राहक संघटनेने उडी घेतली आहे.
प्रवासी ग्राहकांच्या हितासाठी तत्काळ सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, असा इशारा अध्यक्ष डॉ. राजेंद्र आत्राम यांनी दिला आहे. अन्यथा ग्राहक मंचात याचिका दाखल करण्यात येईल, असा अल्टीमेटम दिला आहे. जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर, बंडू लवटे, दामोधर बाजोरिया, यशवंत काळे, सुनील धवने, भैयासाहेब ठमके, सज्जन सोयाम, जयवंत बावने, मनोज गेडाम, दिलीप वाढई, कृतनजय देशपांडे, शेख सत्तार शेख रज्जाक, सचिन मेश्राम, धनराज तिरमनवार, राजेंद्र उपलेंचवार, प्रदीप भानारकर, सचिन काकडे, अजय दुमनवार आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.