लग्नाला नेले नाही, रागाच्या भरात युवतीने उचलले टोकाचे पाऊल

By विलास गावंडे | Updated: May 30, 2023 17:52 IST2023-05-30T17:51:54+5:302023-05-30T17:52:34+5:30

पूजाची आई, वडील आणि भाऊ सोमवारी पिंपळनेर (ता.आर्णी) येथे लग्नाला गेले होते.

parents did not take her to wedding, the young woman commits suicide by hanging | लग्नाला नेले नाही, रागाच्या भरात युवतीने उचलले टोकाचे पाऊल

लग्नाला नेले नाही, रागाच्या भरात युवतीने उचलले टोकाचे पाऊल

आर्णी (यवतमाळ) : लग्नाला नेले नसल्याचा राग धरून १७ वर्षीय युवतीने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना डोळंबा येथे घडली. पूजा दिलीप दुमारे, असे या युवतीचे नाव आहे.

पूजाची आई, वडील आणि भाऊ सोमवारी पिंपळनेर (ता.आर्णी) येथे लग्नाला गेले होते. पूजानेही लग्नाला येण्यासाठी हट्ट धरला होता. तिला सोबत न घेता तिघेही निघून गेले. दरम्यान, तिने घरातच आड्याला नायलॉन दोरी बांधून गळफास लावला. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. त्यानी पूजाच्या वडिलांना माहिती दिली. या घटनेची तक्रार युवतीचे वडील दिलीप महादेव दुमारे (५२) रा. डोळंबा यांनी पोलिसात दिली. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक शिवराज पवार करीत आहे.

Web Title: parents did not take her to wedding, the young woman commits suicide by hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.