घरकूल योजना राबविली जाते, ती गरिबांना छत मिळावे म्हणून. आणि खेड्यात शाळा बांधली जाते, ते गरिबांच्या लेकरांना शिकता यावे म्हणून. पण श्रमिकनगर नावाच्या वस्तीत प्रशासनाने या दोन्ही योजनांची सरमिसळ करून दोन्ही योजनांची वाट लावली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवणी : आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील सर्व नदीनाल्यांना मोठे पुर आले. त्यामुळे नदीकाठावरील शेतांचे नुकसान झाले. यासोबतच वेकोलिच्या कोळसा खाण क्षेत्रात मानवनिर्मीत ढिगारे तयार झाल्याने या ढिगाऱ्यांना नदी नाल्यांचे ...
तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीवर स्वातंत्र्यानंतर प्रथमच स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकला. ध्वजारोहणाचा प्रथम मान सरपंच सुनिता मनोहर पवार यांना मिळाला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेल्या सर्व लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांनी यामुळे आनंद साजरा केला. ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे रखडलेले प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांच्यासोबत सभा घेण्यात आली. राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी ट्रेड युनियनच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सभेमध्ये प् ...
आदर्श गावांसाठी निवडल्या गेलेल्या तालुक्यातील तीनही गावांना विविध समस्यांनी वेढले आहे. मुख्यमंत्रीदूतांनी तयार केलेले विकास आराखडे कागदावरच राहात आहे. परिणामी या गावांच्या ‘आदर्श’ला ब्रेक लागत आहे. ...
वन्यप्राणी आणि शेतकरी असे, द्वंद यवतमाळ वनवृत्तात सुरू आहे. यावर्षी जून अखेरपर्यंत यवतमाळसह, वाशिम-अकोला जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये १७२ शेतकरी-शेतमजूर जखमी झाले, तर सात जणांचे बळी गेले. पिकांच्या नुकसानीची तर मोजदाद करणेही शक्य नाही. र ...
समाज कल्याण विभागांतर्गत येणारी कार्यालये आणि संस्थांमध्ये कार्यरत खासगी कर्मचाऱ्यांवर गंडांतर आले आहे. कर्मचारी पुरविणाऱ्या कंपन्यांशी झालेला करार संपुष्टात आल्याने हजारो कर्मचाऱ्यांवर रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. ...
गेल्या तीन वर्षात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महावितरणच्या भरारी पथकाने राज्याच्या विविध भागात धाड टाकून तब्बल चार कोटींची वीज चोरी उघडकीस आणली. ...
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल नऊ हजार ३३० हेक्टरवरील पिकांचे पाच कोटी ५९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यात एक हजार ३७२ घरांची पडझड झाली असून १८९ कुटुंबांना नऊ लाख ४५ हजार रुपये तात्पुरती मदत देण्यात आली. ...