येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे प्रतिष्ठान, गहुली येथील स्मारक, रहेमतनगर येथील शादीखाना ही तीनही प्रमुख बांधकामे अर्धवट आहेत. ...
तालुक्यातील पहूर येथून आर्णीकडे येणारी एसटी महामंडळाची बस म्हसोला येथील पुलावरून नदीत कोसळली. या अपघातात वाहकासह सात जण जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
शहरातील भीषण पाणीटंचाईच्या काळात टँकरच्या मागणीनुसार टँकर लावण्यात आले. २०१७ च्या कराराचा आधार घेऊन २०१८ मध्ये पाणी वाटप केले. याबाबत संबंधित कंत्राटदाराने वारंवार अवगत करूनही नगरपरिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करून आदेश दिले. ...
प्राचीन वास्तूकलेचा अद्भुत वारसा जपणाऱ्या हेमाडपंथी मंदिरांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. बहुतांश हेमाडपंथी शिवालयांमध्ये श्रावण मासात भाविक आस्थेने गर्दी करीत असले तरी या मंदिरांच्या दुरवस्थेकडे पुरातत्व विभागाने सपशेल दुर्लक्ष केले आहे. ...
१५ आॅगस्टला येथील समाजमंदिराच्या परिसरात असलेल्या शहिद बिरसा मुंडा यांच्या तैलचित्रावर भाजपाने बॅनर लावले होते. त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. ...
वणी शहरावर सध्या एक नवे संकट घोंगावू लागले आहे. ‘स्क्रब टायफस’ या जीवघेण्या आजाराने वणी शहरातील बँक कॉलनी परिसरात एका वृद्धेचा मृत्यू झाल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...
शहराच्या हृदयस्थानी जाणाऱ्या मार्गावर असलेल्या शाळांमधील विद्यार्थिनींना श्वास रोखून विद्यार्जन करावे लागत आहे. शिवाय विद्युत कंपनीचे कर्मचारी, लहान व्यावसायिक आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांचाही श्वास गुदमरत आहे. ...
येथील दत्तशिखर गडावरील प्रमुख यात्रेपैकी एक असलेल्या परिक्रमा यात्रेला (रक्षाबंधन) शनिवारपासून सुरूवात झाली. परिक्रमायात्रेसाठी तेलंगणा व विदर्भातील हजारो भाविक माहूरमध्ये दाखल झाले असून सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
शेजारील जिल्ह्यांमध्ये पसरलेली डेंग्यूची साथ लक्षात घेता यवतमाळ शहरात खासगी रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांकडे डेंग्यू सदृश अशा नजरेने पाहिले जात आहे. ...