जिल्हाभरातील अंगणवाडीताई आणि आरोग्य सेविकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी येथील तिरंगा चौकात आयटकच्या नेतृत्वात धरणे दिले. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. मागण्यांची पूर्तता न झाल्यास संघटना अधिक तीव्र आंदोलन करणार आह ...
अंतरगाव प्रकल्पाच्या कालव्याचे पाणी सोडण्यासाठी लावण्यात आलेल्या पाईपमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून ही बाब पाटबंधारे उपविभागाकडून दुर्लक्षित आहे. ...
राज्यात युती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ६४ वर्षांच्या म्हातारीपासून कोवळ्या मुलीही सुरक्षित नाही. क्राईम रेट वाढला. ...
दररोजच्या आत्मशुद्धिसाठी पंचशीलाचे आचरण करण्याचे आवाहन पूज्य भदन्त व भिक्खू संघाने केले. महागाव येथे आयोजित महावंदना व धम्मदेसना शिबिराच्या मार्गदर्शप्रसंगी ते बोलत होते. ...
येथील पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. ब्रिटीशकालीन निवासस्थाने आता मोडकळीस आली आहे. त्यामुळे अनेक रक्षणकतर्यांवरच भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही पोलीस निवासस्थानांची अवस्था बिकट आहे. ...
भुरकीपोड ते कान्हाळगाव या रस्त्याची अतिशय दैनावस्था झाली असून पायदळ चालणेसुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे संबंधितांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा रस्ताच कायमचा बंद करावा, अशी मागणी संतप्त कान्हाळगाववासीयांनी केली आहे. ...
१४ लोकांचे बळी घेणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेला ताफा ‘लाख’मोलाचा ठरला आहे. विशेष म्हणजे वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी लागणाºया औषधाची एक बॉटल तब्बल २२ हजार रूपयांची असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. ...
यवतमाळात २६ वी ज्युनियर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातल्या २८ जिल्ह्यामधून ४०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. ...
समाज कल्याण खात्यांतर्गत चालविल्या जाणाऱ्या मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये भोजन पुरवठा कंत्राटाच्या निविदा दरवर्षी काढल्या जात असल्या तरी ती एक खानापूर्ती ठरत असून कंत्राटदार मात्र वर्षानुवर्षे जुनेच राहत असल्याचे आढळून आले. ...