पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमती सतत वाढत आहेत. यातून सर्वसामान्य नागरिक हैराणझाले आहे. यामुळे जिल्हा युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी बसस्थानक चौकात आंदोलन करून केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध नोंदविला. ...
येथील नेहरू स्टेडियमवरील राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय तलवारपटू हर्षदा गजानन दमकोंडावार हिने तीन सुवर्णपदक प्राप्त केले. १७ वर्षाच्या हर्षदाने ५२ वेळा राज्यस्पर्धेत सहभाग नोंदविला. ...
आर्णी येथील एका अल्पवयीन मुलीवर एका टोळक्याने दबाव टाकून गेल्या 6 महिन्यांपासून अत्याचार केला. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (11 ऑक्टोबर) आर्णीकरांनी बंद पाळून तहसीलवर मोर्चा नेला. ...
वणीच्या बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली असताना अडत्यांनी गुरूवारपासून धान्य लिलावात सहभागी न होण्याची भूमिका घेतल्याने गुरूवारपासून बाजार समितीतील खरेदी-विक्री ठप्प होण्याची चिन्हे आहेत. ...
आखीव पत्रिकेच्या मागणीसाठी बुधवारी शहरातील नागरिकांचा मोर्चा तहसीलवर धडकला. नायब तहसीलदारांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारल्याने नागरिकांचा रोष शांत झाला. ...
गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्या आदेशाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी जिल्ह्यातील तमाम ठाणेदारांना सर्व प्रकारचे अवैध धंदे तत्काळ पूर्णत: बंद करण्याचे फर्मान सोडले आहे. ...
एका ट्रकमधून कामाच्या ठिकाणी जेसीबी नेत असताना सदर जेसीबीला वीज तारांचा स्पर्श झाला. यात ट्रकचालक जागीच ठार, तर क्लिनर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नांदेपेरा ते रांगणा मार्गावर घडली. ...