वीजचोरी आणि थकीत वसुलीसाठी वरिष्ठांनी इशारा देऊनही महावितरणचे वीज चोरीकडे दुर्लक्ष होत आहे. ग्राहकांनी वारंवार तक्रार करूनही महावितरणच्या कामात सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे. ...
कळंब तालुक्यात वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. ही दहशत कायम असतानाच गावामध्ये १४ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. मध्यरात्रीपर्यंत गावात वीज नसल्याने गावकरी भयग्रस्त आहेत. अखेर गावकऱ्यांनी गुरूवारी वीज कंपनीवर बाईक मोर्चा काढून ऊर्जा राज्यमंत्र्यांसह ...
गेल्या काही दिवसांपासून वणी शहरात डेंग्यूचा प्रचंड उद्रेक झाला असून शेकडो रूग्ण या आजाराने त्रस्त आहेत. ही बाब लक्षात घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाने डेंग्यूशी लढण्यासाठी उपाययोजना करण्यास प्रारंभ केला आहे. ...
बचतगटांनी तयार केलेली उत्पादने दर्जेदार असली तरी ही उत्पादने स्थानिकस्तरापुरतीच मर्यादित आहेत. यामुळे बचतगटांचे उद्योग फारसे वाढले नाही. मार्केटिंगचा अभाव हा उद्योगाच्या विकासातील मोठा अडसर मानला जातो. ...
येथील वार्ड क्रमांक १४-१५ मध्ये सतत अनियमित पाणीपुरवठा होत असून वैतागलेल्या नागरिकांनी बुधवारी नगरपरिषदेवर धडक दिली. त्यांनी येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा नियमित करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. ...
वाहनांच्या गर्दीचा त्रास होत असल्याने धामणगाव (रेल्वे) येथे स्टेशनजवळ एसटी बस थांब्याला तेथील नागरिकांकडून प्रचंड विरोध केला जात आहे. हा थांबा बंद झाल्यास प्रवाशांची एक किलोमीटर पायपीट होणार आहे. ...
कोजागिरीच्या चांदण्यात दूध पिणे आरोग्यदायी मानले जाते. मात्र हेच दूध भेसळयुक्त असल्याने आरोग्यावर दुष्परिणामाचा धोका आहे. जिल्ह्यात दरदिवसाला सव्वालाख लिटर दुधाची गरज असते. प्रत्यक्षात डेअरीपर्यंत ७० हजार लिटरच दुध पोहचते. ...
नगरपरिषदेने शहरात नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या सहा कोटी ५० लाखांच्या निधीतून २०१६ मध्ये विविध कामे प्रस्तावित केली. यातील बहुतांश कामे दलित वस्तीबाहेर मंजूर करण्यात आली होती. या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली. ...