तू पाह्यत राह्यली सगुण, लोक चंद्रावर गेले निघून अशा एकापेक्षा एक सरस कवितांनी श्रोत्यांना रिझविले. प्रसंग होता अंकुर साहित्य संघाच्या ‘आगमन शिशिराचे’ या कवी संमेलनाचे. ...
शहराचे भूषण असलेल्या येथील इंग्रजकालीन शिंगाडा तलाव प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अखेरचा घटका मोजत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासनातर्फे तलावाचे खोलीकरण न करण्यात आल्याने आता केवळ पाण्याचे डबकेच साचले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात जलसिंचन अभियान राबविले. पहिले आरमार उभारले. स्त्रियांची अब्रू राखून सन्मान दिला. छत्रपती हे एक कुशल प्रशासक होते. ‘गमिनी कावा’ हे शिवरायांचे शस्त्र होते. शिवरायांनी विज्ञानवाद व प्रयत्नवाद जोपासला. ...
येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय देण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागणीची दखल घेत रविवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर यांच्यासह जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी प्रस्तावित जागेची स्थळ पाहणी केली. ...
‘मन की बात’ हा अभिनव उपक्रम राबविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पांढरकवड्यातील जाहीर सभेलाही ‘मन की बात’चेच स्वरुप दिले. सुरक्षेच्या नावाखाली ‘आम’ माणसांपासून चार हात राखून वागले म्हणजे माणूस ‘खास’ बनतो. कदाचित हेच सूत्र अवलंबून पांढरकवड्यात मोदींन ...
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी गावकरी पुढे सरसावले आहेत. रविवारी दारव्हा तालुक्यातील चाणी कामठवाडाच्या गावकºयांनी प्रभातफेरी काढून सैनिक कुटुंबांसाठी मदत गोळा केली. ही मदत जिल्हा प्रशासनामार्फत पाठविणार आहे. ...
पुलवामा (काश्मिर) येथे शहीद झालेल्या वीर जवानांना शनिवारी वणीत फेरी काढून श्रद्धांजली वाहण्यात आली. शिक्षण प्रसारक मंडळ व लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या या फेरीत १० हजार विद्यार्थ्यांसह नागरिकही सहभागी झाले होते. ...
शासकीय धोरणामुळे भुकेचा भीषण प्रश्न निर्माण झाला. मोदी साहेब, सांगा आता आम्ही जगायचे कसे, असा जीवन मरणाचा प्रश्न घेऊन जिल्ह्यातील पारधी समाज बांधवांनी मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा ते पांढरकवडा अशी पदयात्रा काढली. ...
देशाचे नेतृत्व करणाऱ्या या नेत्याने शनिवारी जिल्ह्यात आल्यावर स्थानिक रहिवाशांच्या कलाने भाषण केले. यवतमाळसह चंद्रपूर-गडचिरोली भागातील आदिवासी युवकांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. ...